Aryan Khan Case : आर्यन खान प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी; NCB अधिकारीच गोत्यात!

आर्यन खान प्रकरणाच्या तपासात अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत.
Aryan Khan Case
Aryan Khan CaseSaam Tv

Aryan Khan Case : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या ड्रग्ज प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आर्यन खान प्रकरणाच्या तपासात अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात एनसीबी (NCB) अधिकारीच अडकण्याची शक्यता आहे. कारण या तपासामध्ये एसआयटीच्या टीमने गंभीर ठपके ठेवलेले आहेत. (Aryan Khan Case Latest News)

Aryan Khan Case
Mumbai : मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई; तब्बल ३० कोटींचं कोकेन जप्त

एनसीबीशी संबंधित सूत्रांनी मंगळवारी सांगितले की आर्यन खान प्रकरणात एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आपला दक्षता अहवाल दिल्लीतील मुख्यालयात पाठवला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 3000 पानांच्या या अहवालात कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणाच्या तपासातील अनेक 'अनियमितता' आणि एनसीबीच्या जुन्या अधिकाऱ्यांच्या 'संशयास्पद वागणुकीचा' उल्लेख करण्यात आला आहे.

एनसीबीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान प्रकरणात विभागातील जुन्या अधिकाऱ्यांनी आपल्या फायद्यासाठी काही निवडक लोकांना लक्ष केले होते. त्यांनी सांगितले की, या अहवालात एनसीबीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांचे बँक तपशील, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे बँक तपशील आणि त्यांची मालमत्ता यांचाही समावेश करण्यात आला आहे.

Aryan Khan Case
Corona Virus : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली; ही लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा!

एनसीबीच्या या दक्षता अहवालाच्या आधारे 6-7 अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते, ज्यामध्ये आयआरएस अधिकाऱ्यांचाही समावेश असू शकतो. हा दक्षता अहवाल तयार करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “तपासात आढळून आले की या प्रकरणात अनेक अनियमितता आहेत. तपासात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांच्या हेतूवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित 65 लोकांचे जबाब नोंदवण्यात आला आहे. ज्यामध्ये काही लोकांनी तीन-चार वेळा त्यांचे म्हणणे बदलले. या काळात अन्य काही प्रकरणांच्या तपासात त्रुटीही समोर आल्या असून या सर्व प्रकरणांचा अहवाल पाठवण्यात आल्याचे सूत्राने सांगितले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com