Pune News: 'खड्डा दाखवा अन् बक्षीस मिळवा'; रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पुणेकर त्रस्त, कॉंग्रेस आक्रमक

Congress Started Mukhyamantri Ladka Khadda Yojana : पुण्यात मुख्यमंत्री लाडका खड्डा योजना राबवण्यात येतेय. विद्यार्थी कॉंग्रेसने ही योजना सुरू केलीय.
मुख्यमंत्री लाडका खड्डा योजना
Mukhyamantri Ladka Khadda YojanaSaam Tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे

पुणे शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात कॉंग्रेस आक्रमक झाल्याचं दिसत आहेत. त्यामुळे विद्यार्थी काँग्रेसचे संकेत गलांडे यांनी एक अभिनव उपक्रम राबला आहे. मुख्यमंत्री माझा लाडका खड्डा योजना त्यांच्याकडून राबवण्यात येत आहे. 'खड्डा दाखवा आणि बक्षीस मिळवा' असा उपक्रम पुण्यात विद्यार्थी कॉंग्रेस राबवत आहे. खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झालेत. त्यामुळे कॉंग्रेसने आता या खड्ड्यांविरोधात आक्रमक पवित्रा दाखवला आहे.

खड्ड्यांविरोधात कॉंग्रेसचा आक्रमक पवित्रा

पुणे-नगर रोड येथील वडगाव शेरी, खराडी आणि विमान नगर भागात अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झालीय. प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. खड्ड्यात रस्ते, का रस्त्यात खड्डे? प्रश्न शहरात निर्माण (Pune News) झालाय. याविरोधात आता महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस संकेत गलांडे यांच्यावतीने मुख्यमंत्री लाडका खड्डा योजना आयोजित करण्यात आलीय.

मुख्यमंत्री लाडका खड्डा योजना

या योजनेमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येतंय की, आपल्या परिसरातील अत्यंत धोकादायक खड्डा पाठवा. सहभागी नागरिकांना जागरूक नागरिक पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच अत्यंत तीन धोकादायक खड्डे पाठवून जीव वाचवल्याबद्दल पंधराशे रुपये रोख बक्षीस देण्यात येणार (Congress Leader Sanket Galande) आहे. या योजनेमार्फत प्रशासनाचं खड्ड्यांकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न विद्यार्थी कॉंग्रेस करत आहे. त्यामुळेच त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर या योजनेला 'मुख्यमंत्री लाडका खड्डा योजना' असं नाव देण्यात (Potholes On Roads) आलंय.

मुख्यमंत्री लाडका खड्डा योजना
Pune Congress News: 'शहराध्यक्ष अरविंद शिंदेंना हटवा', पुण्यातील काँग्रेस नेत्यांनी दिल्ली गाठली; मल्लिकार्जुन खरगेंशी खलबत

नागरिकांमध्ये जागरूकता

यावेळी संकेत गलांडे म्हणाले की, गेले अनेक दिवस विमान नगर वडगाव शेरी खराडी भागांमध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झालीय. अनेक ठिकाणी खड्डे झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले (Mukhyamantri Ladka Khadda Yojana) आहे. चार चाकी, दुचाकी चालवणं सुद्धा अवघड झालेय. शाळेत कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे अपघात होत आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री लाडका खड्डा योजना सुरू केलीय. या माध्यमातून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे. नागरिकांनी पाठवलेले खड्डे महापालिकेने दुरुस्त केले नाही, तर आम्ही ते स्वतः दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत आहोत अशीही माहिती गलांडे यांनी दिलीय.

मुख्यमंत्री लाडका खड्डा योजना
Sonia Doohan Joined Congress: राष्ट्रीय पातळीवर शरद पवार, अजित दादांना धक्का! राष्ट्रवादीच्या 'लेडी जेम्स बाँड'चा काँग्रेस प्रवेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com