Pune Gokhale Institute: पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या भिंतींवर देशविरोधी घोषणा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक

Gokhale Institute Of Pune: इन्स्टिट्यूटच्या भिंतींवर इन्कलाब झिंदाबाद असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अशात या घटनेची गंभीर दखल घेत दोषी विद्यार्थ्यांविरोधात कारवाई करण्यात आल्याचे संस्थेने सांगितले.
Pune Gokhale Institute
Pune Gokhale InstituteSaam Tv

सागर आव्हाड, पुणे

Pune News:

पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये (Pune Gokhale Institute) धक्कादायक घटना घडली आहे. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथील अकॅडमी बिल्डिंगमध्ये गेल्या काही दिवसांपासून लावलेल्या इलेक्शन कमिशनच्या पोस्टरवर लोकशाहीविरुद्ध आणि देशविरोधी वाक्य लिहिण्यात आली आहेत. त्याचसोबत या इन्स्टिट्यूटमध्ये लावण्यात आलेले पोस्टरची छेडछाड करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूटच्या भिंतींवर इन्कलाब झिंदाबाद असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अशात संस्थेने या घटनेची गंभीर दखल घेत दोषी विद्यार्थ्यांविरोधात कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोखले इन्स्टिट्यूटच्या अकॅडमी बिल्डिंगमधील भिंतींवर देशविरोधी वाक्य लिहिण्यात आले आहेत. या बिल्डिंगमध्ये लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये गोखले इन्स्टिट्यूटचा आणि इलेक्शन कमिशनचा लोगो वापरून नोटा या पर्यायाला मतदान करा अशापद्धतीचा मजकूर आढळून आला. अशापद्धतीचे बॅनर हे गोखले इन्स्टिट्यूट मध्ये गेले दोन-तीन दिवसापासून लागले आहेत. तरीसुद्धा त्यावर प्रशासनाकडून कोणत्याही पद्धतीची कारवाई करण्यात आली नाही.

Pune Gokhale Institute
Pooja Tadas News: लोखंडी रॉडने मारहाण; मला बेघर केलं... भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या सूनेचे खळबळजनक आरोप!

इन्कलाब झिंदाबाद घोषणेमागून लोकशाहीची हत्या करणारे नेमके कोण आहेत? या पोस्टची छेड-छाड करणाऱ्या विरोधात जर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र स्वरूपाचे आंदोलन आज करणार आहे. त्याचबरोबर इलेक्शन कमिशन आणि पोलिस ठाण्यामध्ये देखील याप्रकरणी तक्रार करणार असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सांगितले आहे.

Pune Gokhale Institute
Pooja Tadas News: लोखंडी रॉडने मारहाण; मला बेघर केलं... भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या सूनेचे खळबळजनक आरोप!

दरम्यन, गोखले इन्स्टिट्यूटमध्ये जो प्रकार घडला त्याची संस्थेकडून दखल घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गोखले इन्स्टिट्यूटचे उपकुलगुरू अजित रानडे यांनी दोषी विद्यार्थ्यांविरोधात कारवाई करण्यात आल्याचे सांगितले आहे. 'मी हे पोस्टर पाहिलं नाही पोस्टर मी सोशल मीडियावरती पाहिले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थी आम्ही शोधले. विद्यार्थ्यांनी माफी मागितली आहे.', अशी माहिती अजित रानडे यांनी दिली.

Pune Gokhale Institute
BJP Candidate List: भाजप उमेदवारांची ११ वी यादी जाहीर! महाराष्ट्रातील जागांची घोषणा नाहीचं; सातारा- रत्नागिरीबाबत सस्पेन्स कायम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com