Pune Accident News : देवदर्शन घेऊन निघाले, ४ किमीनंतर भयानक अपघात, नवले ब्रिजवर अख्ख्या कुटुंबाचा अंत

Pune Navale Bridge Accident News : पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला असून कंटेनरला आग लागून ८ जणांचा मृत्यू झाला. देवदर्शनावरून परतणारे कुटुंब, एक ड्रायव्हर आणि राजस्थानमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. १५ हून अधिक जखमी असून पोलिस तपास सुरू आहे.
Pune Accident News : देवदर्शन घेऊन निघाले, ४ किमीनंतर भयानक अपघात, नवले ब्रिजवर अख्ख्या कुटुंबाचा अंत
Pune NewsSaam Tv
Published On
Summary

नवले ब्रिजवर कंटेनरच्या भीषण अपघातामुळे ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू

देवदर्शनावरून परतणारे कुटुंब आणि ३ वर्षांची मुलगी अपघातात मृत्युमुखी

मृतदेह आगीत जळून खाक झाल्याने एका तरुणाची ओळख पटलेली नाही

या अपघातामुळे नवले ब्रिजवरील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

पुण्यात काल संध्याकाळी भीषण अपघात झाला. धक्कदायक म्हणजे अपघात झाल्यानंतर गाडीने पेट घेतला. हा अपघात इतका भीषण होता की अग्नितांडवात मृत पावलेल्या नागरिकांच्या मृतदेहाचा कोळसा झाला. या दुर्दैवी अपघातात ८ निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला, तर १५ जण जखमी झाले आहेत. मात्र यातील एका मृतदेहाची अद्यापही ओळख पटलेली नाही. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आणि मृत्यूंची नावे समोर आली आहेत. याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय आज घटनास्थळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ येऊन पाहणी करणार आहेत.

पुण्यात काल सायंकाळी नवले ब्रीज येते भीषण अपघात झाला.या अपघातात आठ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर १५ जण जखमी झाले. मृत नागरिकांमध्ये नारायणपूरवरून देवदर्शन करून येत असलेल एक कुटूंब होत. हे कुटुंब नारायणपूरला गुरुवार असल्याने दर्शनासाठी गेले होते. नारायणपूरहून देवदर्शन करून येत होते. यामध्ये पती,पत्नी आणि मुलगी हे सगळे धायरी फाटा येथील राहणारे होते. या कुटुंबात ३ वर्षाची मुलगी चिखली पिंपरी चिंचवडमधील होते.

Pune Accident News : देवदर्शन घेऊन निघाले, ४ किमीनंतर भयानक अपघात, नवले ब्रिजवर अख्ख्या कुटुंबाचा अंत
Navi Mumbai Airport : अखेर मुहूर्त ठरला! 'या' दिवशी नवी मुंबईहून विमान झेपवणार, वाचा सविस्तर

हे कुटुंब देवदर्शनाला चालले होते म्हणून तिला बरोबर घेऊन गेले होते. या कारमध्ये त्यांच्यासोबत ड्रायव्हर आणि त्याचा मित्र होता. या अपघातात पुण्यातील एकाच घरातील तीन जणांचा मृत्यू झालाय. स्वाती नवलकर वय ३७ ,आई शांता दाभाडे आणि दत्तात्रय दाभाडे वडील या तिघांचा दुर्दैवी मृत्यू तर मयत तीन वर्षाची मुलगी ही स्वाती नवलकर यांच्या मैत्रिणी ची मुलगी होती. तर धनंजय कोळी हा चालक पण ओळखीतील होता. या सर्वांचा जागीच मृत्यू झाला आहे. नारायणपूर दर्शनावरून परत येताना घरापासून अवघ्या ३ ते ४ किलोमीटर असतील तेव्हा हा भीषण अपघात झाला, आणि यात त्यांना जीव गमवावा लागला.

Pune Accident News : देवदर्शन घेऊन निघाले, ४ किमीनंतर भयानक अपघात, नवले ब्रिजवर अख्ख्या कुटुंबाचा अंत
Sharad Pawar News : "माझं लग्न होत नाही कृपया... " लग्नाळू तरुणाचं थेट शरद पवारांना पत्र, वाचा नेमकं काय म्हणाला....

उरलेल्या मृतांमध्ये एक कंटेनर ड्रायव्हर आणि हेल्पर होते. त्यांची नावे रुस्तम खान ट्रक चालक आणि मुस्ताक हनीफ खान हेल्पर दोघेही राजस्थानचे रहिवासी होते. त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये रोहित कदम २५ वर्षीय तरुण कोण आहे याची ओळख मात्र पटू शकली नाही. याबाबत सिंहगड पोलिस अधिक तपास करत आहेत.

Pune Accident News : देवदर्शन घेऊन निघाले, ४ किमीनंतर भयानक अपघात, नवले ब्रिजवर अख्ख्या कुटुंबाचा अंत
Pune News : पुण्यात निवडणुकीची रणधुमाळी, नगरपरिषद - नगरपंचायतींसाठी धुरळा उडाला, कोणामध्ये होणार लढत?

रोहित ना ट्रक मध्ये होता ना कारमध्ये त्याचा मृत्यू कसा झाला हे मात्र कळू शकले नाही. मृतांवर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र नवले पुलावर होणारे अपघात गेले अनेक वर्षापासून चिंतेची बाब असल्याने आता तरी प्रशासन जाग होणार का हा मोठा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com