Pune GBS Update : पुण्यात काल तरूणीचा बळी, आज तरूणाचा गेला जीव; जीबीएसची दहशत वाढली!

Pune Youth Dies due to GBS : पुण्यातील नांदेड सिटीमध्ये राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाने जीबीएसमुळे जीव गमावला आहे. जीबीएसची लागण झाल्याने २५ जानेवारी रोजी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात या तरुणाला दाखल करण्यात आलं होतं.
youth dies due to GBS
youth dies due to GBSSaamTV
Published On

पुणे : पुण्यामध्ये जीबीएस आजारानं सर्वांचं टेन्शन वाढवलं आहे. पुण्यात जीबीएसने काल आणखी एकाचा बळी गेला आहे. २१ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. किरण देशमुख असं या तरुणीचे नाव असून तिच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. तर आता अजून एका तरुणाचा जीबीएस व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात या व्हायरसची गाठ पक्की होत चालली असल्याचं दिसत आहे.

पुण्यातील नांदेड सिटीमध्ये राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाने जीबीएसमुळे जीव गमावला आहे. जीबीएसची लागण झाल्याने २५ जानेवारी रोजी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात या तरुणाला दाखल करण्यात आलं होतं. काल संध्याकाळच्या सुमारास या तरुणाचा मृत्यू झाला. शहरात जीबीएसमुळे झालेल्या मृत्यूचा आकडा ११वर पोहोचला आहे. गेल्या चार दिवसात या व्हायरसमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे.

youth dies due to GBS
कडेलोट! छत्रपती शिवरायांना अभिवादन करताना पोलीस निरीक्षकाच्या पायात बूट; फोटो व्हायरल

दरम्यान, बारामतीची किरण राजेंद्र देशमुख (वय २१) या तरुणीचा जीबीएस आजाराने काल मंगळवारी मृत्यू झाला. गेल्या तीन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून तिची या आजाराशी झुंज सुरू होती. बारामतीतील किरण ही सिंहगड परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे राहत होती. याच दरम्यान तिला जीबीएस आजाराची लागण झाली होती. तिच्यावर उपचार सुरू होते पण उपचारादरम्यान तिने प्राण सोडले.

youth dies due to GBS
Political News : छत्रपती शिवरायांच्या श्रद्धांजलीवरून ट्विटर वॉर; आधी राहुल गांधींचं ट्विट, आता काँग्रेसने समोर आणली PM मोदींची 'ती' पोस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com