Water Shortage : पुण्यात पाणीबाणी! 'या' भागांत २४ तास पाणी पुरवठा राहणार बंद; जाणून घ्या कारण

Pune Water Supply Cut News : पुणे शहरात २९ जानेवारी रोजी जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेने नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन केले आहे.
Water Shortage : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुढील २४ तास पाणी राहणार बंद, जाणून घ्या कसं असेल नियोजन
Pune Water Shortage NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुणे शहरात २९ जानेवारीला पाणीपुरवठा पूर्णतः बंद

  • जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्ती कामामुळे निर्णय

  • ३० जानेवारीला कमी दाबाने व उशिरा पाणीपुरवठा होणार

  • महापालिकेचे नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन

अक्षय बडवे, पुणे

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! जलशुद्धीकरण केंद्रामध्ये विद्युत व स्थापत्यविषयक देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असून शहराच्या बहुतांश भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेने नागरिकांना पाणी साठवण करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

पुणे महापालिकेने उद्या म्हणजेच २९ जानेवारी रोजी पुण्यातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे जाहिर केले आहे. जलशुद्धीकरण केंद्रामध्ये विद्युत व स्थापत्यविषयक देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शहरातील भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा होणारा भाग वगळून उर्वरित संपूर्ण शहरात पाणी पुरवठा ठप्प करण्यात येणार आहे. मात्र ३० जानेवारी म्हणजेच शुक्रवारी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

Water Shortage : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुढील २४ तास पाणी राहणार बंद, जाणून घ्या कसं असेल नियोजन
Girish Mahajan : भाषणात आंबेडकरांचं नाव घेतलं नाही, महिला पोलिस अधिकारी संतापली; थेट गिरीश महाजनांना जाब विचारला, VIDEO चर्चेत

'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद

संपूर्ण पेठा, संपूर्ण कोथरूड, वारजे, बावधन, बाणेर, बालेवाडी, पाषाण, औंध, बोपोडी, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, मुंढवा, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, इंदिरानगर, पर्वती गावठाण, मितानगर, कुमार पृथ्वी, कोंढवा खुर्द, कात्रज, दत्तवाडी, हिंगणे, आनंदनगर, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव खुर्द-बुद्रूक, येवलेवाडी, सहकारनगरचा काही भाग, टिळकनगर, दाते वसाहत आदी भाग प्रभावित होणार आहेत.

Water Shortage : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुढील २४ तास पाणी राहणार बंद, जाणून घ्या कसं असेल नियोजन
Rain Alert : धुळे-जळगावात गारांचा पाऊस, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट, भर हिवाळ्यात पावसाचा धुमाकूळ, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

'या' भागांवरही होणार परिणाम

आंबेगाव बुद्रूक-खुर्द, सुखसागर नगर, राजस सोसायटी, कात्रज गावठाण, धनकवडी, खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, इऑन परिसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, धनेकर नगर, यशवंतनगर, चंदननगर, सुनीतानगर, धर्मनगर, धनलक्ष्मी सोसायटी, गणेशनगर, आनंदपार्क, राजश्री कॉलनी, महादेवनगर, माळवाडी, मनोहर सोसायटी, लष्कर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, गांधी भवन, जीएसआर टाकी, शिवणे इंडस्ट्रीज, एसएनडीटी, एएलआर, चतु:शृंगी टाकी, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल व खडकवासला-नांदेड बूस्टर पंपिंग अंतर्गत येणाऱ्या भागांवरही या बंदचा परिणाम होणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com