Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; महापालिकेने घेतला पाणीकपातीचा निर्णय

Pune Water Cut: पुणेकरांसाठी मोठं वृत्त हाती आलं आहे. पुणे महापालिकेने पाणी पुरवठ्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Water Cut
Water CutSaam Tv
Published On

Pune News: पुणेकरांसाठी मोठं वृत्त हाती आलं आहे. पुणे महापालिकेने पाणी पुरवठ्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिका येत्या १८ मे पासून पाणीकपात लागू करणार आहे. त्यामुळे पुणेकरांना जपून पाणी वापरावे लागणार आहे. (Latest Marathi News)

पुणेकरांना भर उन्हाळ्यात पाणीकपातीच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. एल निनोमुळे पुण्यात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा पुण्यातील धरण साखळीमध्ये गेल्या वर्षी इतकाच साठा उपलब्ध आहे. सध्या ९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुणे शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Water Cut
Igatpuri Water Shortage: इगतपुरीत भीषण पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी मैलोमैल पायपीट

पाणीकपातीच्या निर्णयानंतर पुणे शहरात आठवड्यापासून एकदा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहरात पुढच्या वर्षी पाणीटंचाई नको म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

पाणीकपातीच्या निर्णयाबद्दल सांगताना पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले की, 'यावर्षी एल निनो मुळे पाऊस लांबणार किंवा कमी होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे . यासाठी शासन स्थरावरही बैठका झाल्या आहेत. त्यामुळे उपलब्ध साठा योग्यरित्या वापरावा, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत'.

Water Cut
Mumbai-Goa Highway Update: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत मोठी अपडेट; नितीन गडकरींनी दिली महत्वाची माहिती

'पावसाळा लांबला तर नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यासाठी पुणे शहरात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद राहील . शहरात पुढच्या वर्षी पाणीटंचाई नको म्हणून निर्णय घेण्यात आला आहे. १८ मे पासून लागू पाणीकपात होणार आहे. ही पाणीकपात जूनपर्यंत लागू राहील, अशी माहिती पावसकर यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com