Unauthorized Bar in Pune : पुण्यातील 'पब संस्कृती'वर बुलडोझर; दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई, VIDEO

Pune Drug Case : पुणे महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई केली आहे. पालिकेने अनधिकृत बार-हॉटेल्सवर हातोडा चालवला आहे. धडक कारवाई करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
पुणे महापालिकेची सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई; अनधिकृत बार-हॉटेल्सवर चालवला हातोडा
pune accident update Saam tv
Published On

पुणे : पुणे महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण विभागाने कारवाई सुरु केली आहे. पुणे शहरातील दुसऱ्या दिवशी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई सुरु केली आहे. या विभागाने शहरातील बार आणि पबमधील अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा चालवला आहे.

पुणे शहरासहित पाषाण भागातील एफएमएल बारच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यास सुरुवात केली आहे. पुणे विभागाच्या अतिक्रमण विभागाने काल दिवसभरात २६ हॉटेल, रेस्टॉरंटवर ही कारवाई केली.

पुणे महापालिकेची सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई; अनधिकृत बार-हॉटेल्सवर चालवला हातोडा
Pune Crime News : 3 कोटी रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त,पुण्यात दोघांना अटक

पालिकेने दिवसभरात एकूण ३७ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पुणे महापालिकेने ही धडक कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. पुण्याच्या बाणेरमध्येही द कॉर्नर लाऊंज, मुरकुटे गार्डनजवळील पॅनकार्ड क्लब रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

अनधिकृत बांधकामाविरोधात पालिका आक्रमक

पुणे महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यातील हॉटेल पब बारवर देखील कारवाई केली जात आहे. तसेच एस्कोबार या हॉटेल कारवाई करण्यात येणार आहे. पालिकेने एस्कोबार हॉटेलला देखील नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतरही त्यांनी काही न केल्यास अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

पुण्यातील पतीत पावन संघटनेचे ड्रग्ज विरोधात आंदोलन

पुण्यात पतीत पावन संघटनेचे ड्रग्ज विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. पुण्यातील ड्रग्ज पार्टीच्या विरोधात पतित पावन संघटनेनं गुडलक चौकात आंदोलन केलं आहे. अमली पदार्थ विरोधी दिनाचं औचित्य साधत पतीत पावन संघटनेकडून प्रतीकात्मक ड्रग्जचा रावण असलेलं बॅनर जाळण्यात आलं.

पुणे महापालिकेची सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई; अनधिकृत बार-हॉटेल्सवर चालवला हातोडा
Pune Drug News : पुण्यातील अनधिकृत पब आणि बारवर पालिकेचा हातोडा, धडक कारवाई

काँग्रेसचा पालिकेवर गंभीर आरोप

दरम्यान, या करवाईदरम्यान, काँग्रेसने पुणे महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांना पत्र लिहिलं आहे. पुणे शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकामाला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने पत्रातून केला आहे. बांधकाम विभागावर कारवाई झाली नाही, तर महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com