PMC Health Chief Transfer: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांची तडकाफडकी बदली; ५ महिन्यातच पदावरून उचलबांगडी

Pune Municipal Health Chief Transfer: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
 Pune Municipal Corporation Chief Health Officer Dr. Bhagwan Pawar has been transferred in 5 months
Pune Municipal Corporation Chief Health Officer Dr. Bhagwan Pawar has been transferred in 5 monthsSaam TV

सचिन जाधव, साम टीव्ही

Pune Municipal Health Chief Transfer: पुणे महापालिकेच्या आरोग्यपदावर कार्यरत असलेले डॉ. भगवान पवार यांची उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती आहे. अवघ्या ५ महिन्यातच भगवान पवार यांची बदली करण्यात आली आहे. मंगळवारी आरोग्य विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला असून आता भगवान पवार सहाय्यक संचालक आरोग्य सेवा अंधत्व नियंत्रण कार्यक्रम मुंबई येथे रुजू होणार आहे. (Latest Marathi News)

 Pune Municipal Corporation Chief Health Officer Dr. Bhagwan Pawar has been transferred in 5 months
Kirit Somaiya Viral Video : भाजप नेते किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण, मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

भगवान पवार यांच्यासोबत जिल्हापरिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांचीही बदली करण्यात आली आहे. हंकारे यांची सहायक संचालक आरोग्य सेवा औदयोगिक विभाग मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेचे आरोग्यप्रमुख आशिष भारती यांची तातडीने बदली करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले होते. त्यांच्या बदलीनंतर या जागेवर डॉ. भगवान पवार यांची ११ मार्च २०२३ रोजी दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती.

 Pune Municipal Corporation Chief Health Officer Dr. Bhagwan Pawar has been transferred in 5 months
Manoj Jarange Health: मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली; डॉक्टरांचं एक पथक तातडीने उपोषणस्थळी

मात्र, नियुक्तीच्या ५ महिन्याच्या कालावधीतच पवार हे वादग्रस्त ठरले होते. दरम्यान, गेल्या महिन्यात महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आशिष बंगीनवार यांना १० लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.

यासाठी महापालिकेने एक चौकशी समिती नेमली होती. या नेमलेल्या समितीमध्ये डॉ. पवार यांचा समावेश होता, त्यांनी नुकताच चौकशी अहवाल आयुक्तांना सादर केला होता. या अहवालानंतरच त्यांची बदली करण्यात आल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com