(अश्विनी जाधव-केदारी)
पुणे : पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नवले पूल अपघातांचे केंद्र बनला आहे. गेल्या काही महिन्यात या पुलावर झालेल्या अपघातांत अनेकांनी प्राण गमावले आहेत. महापालिकेने हे अत्यंत गंभीरपणे घेतले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी (NHAI) समन्वय साधत या पुलावरचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत NHAI कडे अहवाल मागवला होता. (Pune Mayor Murlidhar Mohol on Navale Bridge Accidents)
हा अहवाल महापालिकेकडे सादर झाला आहे. पुण्यातील (Pune) वडगाव पूल आणि नवले पूल (Navale Bridge) दरम्यान नव्याने एक पूल बांधून राष्ट्रीय महामार्गला जोडण्याचा उपाय त्यात सुचविण्यात आला आहे. सर्व्हिस रस्ताची कामे, महामार्गावरील (Highway) पंक्चर काढणे,अतिक्रमण काढणे अश्या आपत्कालीन उपाययोजनाही सुचवण्यात आल्या आहेत. अपघातग्रस्त भागात उपाययोजनांना सुरुवात; युद्धपातळीवर कामे पूर्ण करणार, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले आहे.
वारंवार अपघात (Accident) होणाऱ्या नवले पूल आणि परिसरात उपाययोजनांना सुरुवात झाली असून या कामात तातडीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजना अशा दोन्ही टप्प्यांवर काम सुरु झाले आहे, अशी माहिती महापौर मोहोळ यांनी दिली आहे. यासाठी महापालिकेच्या बाजूने पूर्ण क्षमतेने काम करत आहोत. सर्व उपाययोजना संयुक्तिकरित्या होत असल्याने त्या नक्कीच प्रभावी आणि परिणामकारक असतील, यात शंका नाही, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे.
अशा असतील कायमस्वरुपी उपाययोजना
- भूमकर चौक ते नवले पूल आणि विश्वास हॉटेल चौक या दोन ठिकाणी अंडरपास करण्यात येणार
- सिंहगड रस्ता ते मुंबई बायपासला जाण्यासाठी आणि महामार्गावरुन सिंहगड रस्त्याला जाण्यासाठी क्लोव्हर लिफ जंक्शनचे विकसन करण्यासाठी डीपीआर तयार करण्यात येणार
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.