वाळू तस्कराने पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीला उडवलं; थरार सीसीटीव्हीत कैद

या वाळू तास्कारांविरोधात तक्रारी करूनही अनेक वेळा दखल घेतली जात नाही.
Aurangabad News
Aurangabad Newsडॉ. माधव सावरगावे
Published On

औरंगाबाद - जिल्ह्यातील गोदापात्रातुंन वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाळू तस्कराने पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या (Police) गाडीला उडवून देण्यासाठी ट्रक पोलीस थेट गाडीवर घातला. सुदैवाने पोलिसांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला घेतली, अन्यथा पोलीस चिरडले असते. वैजापूरजवळ (Vaijapur) भर रस्त्यावर दहशत निर्माण करणारी ही घटना रविवारी घडली आहे. हा थरार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीपात्रात मोठ्याप्रमाणावर बेकायदेशीर पणे वाळू उपसा करण्याच्या तक्रारी नदी काठचे गावकरी करीत आहेत. या वाळू तास्कारांविरोधात तक्रारी करूनही अनेक वेळा दखल घेतली जात नाही. (Latest Aurangabad News)

उलट याबाबत तक्रारी करणाऱ्यांना दमबाजी होत असते. रविवारी सकाळी तर चक्क पोलिसांच्या गाडीला उडवण्याचे धाडस वाळू तस्करांकडून झाल्याने गोदा काठावरील नागरिकात दहशत पसरली आहे. गोदावरी नदीचा अर्धा भाग वैजापूर व अर्धा भाग श्रीरामपुर तालुक्यात येतो त्यामुळे दोन्ही तालुक्यातील वाळू माफियांचा गोदापात्रात 'नंगा नाच' राजरोस सुरु आहे. मात्र, वाळू वाहतूक करणारी ही वाहने अडविण्याचे धारिष्ट्य पोलिसांसह महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होत नाही. त्यामुळे ही यंत्रणा महसूल विभागासह पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

हे देखील पहा -

त्यामुळे गोदा काठावरील ग्रामस्तांनी अता नदी पात्रात सुरु असलेल्या अवैध वाळू उपसाचे व्हिडिओ सोशल मिडियावर टाकून प्रशासनाला जागे करताना दिसत आहे. त्यामुळे आता दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी या प्रकाराकडे लक्ष घालण्याची वेळ आली आहे. गोदा पात्रातील अनधिकृत वाळू व्यवसायामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहेत. कोणत्याही प्रकारचे ठेके नसणारेही गोदावरी नदीपात्रांसह गावालगतचे ओढे वाळूसाठी पोखरु लागले आहेत.

वाळूमाफियांचा वाढत झालेला धुडगूस आता स्थानिक पोलीस व महसूल विभागाच्या आवाक्‍याबाहेर गेला आहे. त्यातच राजकीय पाठबळामुळे या वाळूमाफियांना कोणताही लगाम राहिलेला नाही. त्यामुळे दरारोज गोदावरीवर सुरु असलेला अत्याचार रोखण्यासाठी छोटी कारवाई नको आता ग्रामीण पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे अशी मागणी गोदा काठावरील नागरिक करत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com