Vande bharat
Vande bharatSaam Tv

Vande Bharat Train: पुणेकरांसाठी खुशखबर! आता २ नव्हे, तर ६ वंदे भारत एक्स्प्रेस धावणार

Vande Bharat Train: प्रवासाचा कालावधी कमी होऊन प्रवास अधिक सुखकर व्हावा या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने पुण्याहून आणखी ४ वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
Published on

Pune Vande Bharat: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने पुण्याहून आणखी चार वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पुण्यापासून दोन वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन धावतात. आणखी चार एक्स्प्रेस गाड्यांमुळे प्रवासाला अधिक गती मिळणार आहे.

अलिकडेच पुण्याहून दोन वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा प्रवास सुरु झाला आहे. या एक्स्प्रेस ट्रेनच्या मार्गिकेवर पुणे-हुबळी, पुणे-कोल्हापूर आणि मुंबई-सोलापूर व्हाया पुणे या मार्गांचा समावेश होतो.. आता नव्या अतिरिक्त वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांमुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन प्रवाशांचा फायदा होणार आहे.

Vande bharat
Mumbai Local Train: नववर्षाच्या स्वागतासाठी मध्य रेल्वे सज्ज, तिन्ही मार्गावर धावणार विशेष लोकल; पाहा वेळापत्रक

मिळालेल्या अहवालानुसार, पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते बेळगाव या चार मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस गाडी धावणार आहे. लवकरच या एक्स्प्रेस ट्रेन सुरु होतील असे म्हटले जात आहे. असे झाल्यानंतर पुण्याहून आठवड्याला तब्बल ६ वंदे भारत एक्स्प्रेस धावतील. प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी हा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

सध्या सुरु असलेल्या पुणे-कोल्हापूर या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे एका वेळेचं तिकीट ५६० रुपये आहे. तर विशेष कोचमध्ये प्रवास करण्यासाठी १,१३५ रुपये शुल्क भरावे लागते. ही एक्स्प्रेस बुधवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी असते. वंदे भारतच्या पुणे-हुबळी मार्गिकेवर प्रवास करायचा असल्यास १,५३० रुपये तिकीट घ्यावे लागते. तर विशेष कोचचे तिकीट २,७८० इतके आहे.

Vande bharat
Pune Metro: पुणे मेट्रोचा आणखी विस्तार होणार, 7 मार्ग आणि ५५ स्टेशन, वाहतूककोंडीला ब्रेक लागणार!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com