पुण्यात ड्रग्जच्या नशेसाठी फुलचंद पान, पानांआडून अमली पदार्थांची तस्करी

Pune Drug Racket Fulchand: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याला ड्रग्जचा विळखा पडलाय. तरुणाई नशेच्या खाईत लोटली जातेय. अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी आता चक्क् टपऱ्यांवरही वॉच ठेवायला सुरुवात केली आहे. आम्ही असं का म्हणतोय ? पाहा पुण्यातील साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट...
Pune Police seize drug-laced powder used in ‘Fulchand Pan’ during a crackdown on narcotics sold at paan stalls.
Pune Police seize drug-laced powder used in ‘Fulchand Pan’ during a crackdown on narcotics sold at paan stalls.Saam Tv
Published On

"एक कडक फुलचंद दे" अशी मिजाज ठेवत पान तोंडात टाकलं असाल तर आता सावधान..,कारण आता याच फुलचंद पानामधून अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक वास्तव पुण्यातून समोर आलं आहे. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकानं बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पानटपरीवर छापा टाकला आणि पानामधून सुरू असलेला हा ड्रग्जचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पुणे शहरातील पान टपऱ्यांमधून 'कडक फुलचंद' या पानाच्या नावाखाली पांढऱ्या पावडरमध्ये घातक अंमली पदार्थांचे मिश्रण करून विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हिंजवडीमध्ये नशा येणा-या पानाच्या विक्री प्रकरणी दोघांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून 8 किलो 760 ग्रॅम वजनाची अंमली पदार्थ मिश्रित भुकटी म्हणजेच पावडर जप्त करण्यात आली आहे. ज्याची किंमत साडे सात लाख रुपये आहे.

एक कडक फुलचंद पान खाल्लं की त्यांची झिंग चढते आणि त्याची चटक लागते.. या पानामुळे कशी नशा होते ते पाहूया...फुलचंद मध्ये नेहमीच्या पदार्थांसह अंमली पदार्थ मिश्रित भुकटी तयार करून ती पानात टाकली जाते. नशा येण्यासाठी अँफेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स, ओपिएट्स आणि मेथॅम्फेटामाइन याची पावडर टाकतात. हे पान खाल्लं की झिंग चढते. मात्र त्याचा मानवी मेंदूवर घातक परिणाम होतो. त्यामुळे तस्करीचे हे जाळे तोडून टाकण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, आयटी हब, विद्येचे माहेरघर अशी विशेषण मिरवणारं पुणे हळूहळू उडता पंजाबच्या मार्गावर आहे. पुण्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ड्रग्जचे साठे जप्त केले जातायेत. शहरात शिक्षणासाठी येणारी तरुणाई सहजपणे ड्रग्ज तस्करांच्या जाळ्यात अडकते आहे. त्यामुळेच ड्रग्जचे नवनवे प्रकार येतायेत तरुणांना नशखोर बनवतायेत.फुलचंद पान हा त्याचाच प्रकार. एकूणच "ड्रग्स फ्री पुणे" करायंच मोठ आव्हान पुणे पोलिसांसमोर असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com