
अक्षय बडवे
पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. कारण पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे मुख्य धरण खडकवासला आता १०० टक्के भरलं आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. खडकवासला धरण क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसात खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. (Latest News)
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात 97 टक्के म्हणजेच 28 टीएमसी पाणीसाठा सध्या आहे. टेमघर वगळता सर्व धरणे भरले १०० टक्के भरली आहे. (Pune News)
गेल्या चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवसात पुणे शहर व घाट परिसरात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
खडकवासला: १०० टक्के पाणीसाठा
पानशेत: १०० टक्के पाणीसाठा
वरसगाव: १०० टक्के पाणीसाठा
टेमघर: ७९.२१ टक्के पाणीसाठा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.