Pune Crime News: घरातून जा म्हटल्याने चिडलेल्या घरजावयाने केली सासूला मारहाण; अंगावर ओतले गरम पाणी, पाडले दात

Pune News: पुण्यातील खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला प्रकार
Pune Crime News Today
Pune Crime News TodaySaam Tv

अक्षय बडवे

Todays Pune Crime News: राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरातून जा म्हटल्याने चिडलेल्या घरजावयाने सासूला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Pune Crime News Today
Coal Mine Explosion: नागपूरच्या सिल्लेवाडा कोळसा खाणीत स्फोट, 11 कामगार जखमी

नेमकं प्रकरण काय?

घरजावायला घरात राहू नको, जिघून जा असे सांगितल्याने रागाच्या भरात जावयाने सासूच्या अंगावर गरम पाणी फेकून तिला जबर मारहाण केली. एवढेच नाही तर सासूचे डोके फरशीवर आपटून तिचे दात पाडले. पुण्यातील (Pune) खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी घरजावयाला अटक केली.

सुजाता कैलास शिंदे (५०) असे जखमी झालेल्या सासूचे नाव असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर महेंद्र सिद्धनाथ तोरणे (२५) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सुजाता शिंदे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News)

Pune Crime News Today
Vikas Tingre News: काँग्रेसचे पदाधिकारी विकास टिंगरेंनी संपवलं आयुष्य; नेमकं कारण काय?

शिंदे या खडकीत असणाऱ्या दारूगोळा कारखान्यात कामाला आहेत. शिंदे यांची मुलगी आणि जावई महेंद्र तोरणे त्यांच्याकडे राहायला आहे. जावई तोरणे यांच्याशी शिंदे याचा काहीतरी कारणावरून वाद झाला. यातून शिंदे यांनी महेंद्रला घरात राहू नको,जिघून जा असे सांगितले. (Crime News)

त्यावरून चिडलेल्या महेंद्रने शिंदे यांच्या अंगावर गरम पाणी ओतले तसेच सासूचे डोके फरशीवर आपटले आणि मारहाण केली. या मारहाणीत शिंदे यांचे दोन दात तुटले. शिंदे यांच्यावर गरम पाणी फेकल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com