Pune Crime News: मी इथला भाई! कोयत्याचा धाक दाखवून आधी जबरदस्ती लिफ्ट, नंतर डिलिव्हरी बॉयला लुटले

Pune Sahakarnagar Police Station: ही घटना पुण्याच्या बालाजीनगर येथे बुधवारी रात्री ११ वाजता घडली होती.
Pune Police
Pune Police Saam Tv
Published On: 

सचिन जाधव, पुणे

Pune News: पुण्यामध्ये (Pune) कोयता गँगची (Koyta Gang) दहशत कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये कोयत्याचा धाक दाखवून झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला (Zomatos delivery boy) जबरदस्ती लिफ्ट मागितली. त्यानंतर त्याला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) आरोपीला अटक केली आहे.

Pune Police
Pune Crime News: नितीन म्हस्के हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, ४८ तासांत सर्व आरोपींना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात कोयत्याचा धाक दाखवून झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून जबरदस्तीने लिफ्ट घेऊन त्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटले. ही घटना पुण्याच्या बालाजीनगर येथे बुधवारी रात्री ११ वाजता घडली होती. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली. हर्षद राजेंद्र देशमुख (वय २७, रा. चव्हाणनगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Pune Police
Bihar Crime News: बिहारमध्ये गुंडाराज! भल्या पहाटे पत्रकाराची हत्या, घरात घुसून चौघांनी केला बेछुट गोळीबार

याप्रकरणी फिर्यादीने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादी हा झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. सागर लॉजमध्ये ते बुधवारी रात्री पार्सल देऊन परत येत होते. मोटार सायकलवरुन जात असताना हर्षद देशमुख हा अचानक त्यांच्या मोटारसायकलवर बसला.

Pune Police
Yavatmal News: यवतमाळमधील बीआरएसच्या नेत्याने आमदारांवर बॉम्ब हल्ला करण्याची दिली धमकी, काय आहे कारण?

फिर्यादीला कोयत्याचा धाक दाखवून माझे नाव हर्षद देशमुख आहे. मी इथला भाई आहे. तू जर मला चव्हाणनगर येथे नेऊन सोडले नाही तर तुला मारुन टाकेन, असे म्हणत त्याने शिवीगाळ केली. जबरदस्ती फिर्यादीला मोटारसायकल चव्हाणनगरमधील शनि मंदिराजवळ नेण्यास भाग पाडले.

तेथे आल्यावर फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर घटनास्थळी जमलेल्या लोकांच्या दिशेने हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपी हर्षद देशमुखला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.