Pune Crime News : पुण्यात भेसळयुक्त तुपाच्या गोडाऊनवर छापा; मुद्देमालासह आरोपी ताब्यात

१५० किलो भेसळयुक्त तूप आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV
Published On

पुणे : पुण्यातील (Pune) कात्रज परिसरात एका गोडाऊन वर छापा टाकत, भेसळयुक्त तूप बनवणाऱ्या एका आरोपीला पुणे पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत पुणे पोलिसांना जवळपास १५० किलो भेसळयुक्त तूप आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भारती विद्यापीठ पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. (Pune Latest Maarathi News)

Pune Crime News
तंगडं तोडून टाकीन समजलं का..., पुण्यात महिला पोलिसाकडून हमालाला मारहाण, पाहा VIDEO

मोहिंदर सिंग देवरा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून डालडा, पामतेल, कलर आणि अन्य विषारी रसायनासह आदी पदार्थ देखील अन्न व औषध प्रशासनाने जप्त केले आहेत. त्यासोबतच एक लाखाचा इतर मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी आरोपी मोहिंदर देवरा याला अन्न व औषध प्रशासन विभागाने ताब्यात घेतले असून भेसळ युक्त १५० किलो सामुग्री जप्त करून तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे. (Pune Todays News)

Pune Crime News
Nanded News : भयंकर घटना! एका विडीने अख्खं कुटुंब संपवलं; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

नाशिकमध्ये उच्च प्रतीचे खाद्यतेल असल्याचं भासवून कमी दर्जाचं तेल ग्राहकांच्या माथी मारलं जात असल्याचा संशय अन्न आणि औषध विभागाला होता. यावेळी त्यांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार, शिंदे गावाजवळच्या माधुरी रिफायनर्स कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाचा छापा टाकला.

यावेळी तेलाच्या डब्यांवर फोर्टीफाइड तेलाचा उल्लेख प्रत्यक्षात मात्र पल्स एफ चा सिम्बॉल नसल्याचं समोर आलं आहे. या छाप्यात १ कोटी १० लाख ११ हजार २८० रुपयांच्या खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.खाद्यतेल आणि वनस्पती तुपाचे ३२ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.

Edited By Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com