Dog Beaten In Pune: कुत्र्याच्या पिल्लाला लाथा बुक्यांनी केली बेदम मारहाण; Video पाहताच महिलेने शिकवला धडा

पुण्यात श्वानाला मारहाण केल्याने गुन्हा दाखल झाल्याची घटना घडली आहे.
Dog Beaten In Pune
Dog Beaten In PuneSaam TV

अक्षय बादवे

Pune Crime News: भटक्या श्वानाचा त्रास प्रत्येकच नागरिकाला होत असतो. अनेकदा हे श्वान आपली आही चूक नसतानाही अंगावर धावून येतात आणि चावा घेतात. भटक्यांप्रमाणेच पाळीव कुत्र्यांपासून देखील अशा समस्या निर्माण होतात. अशात पुण्यात श्वानाला मारहाण केल्याने गुन्हा दाखल झाल्याची घटना घडली आहे. (Pune News)

पुण्यात चक्क श्वानाला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ महिन्याच्या सायबेरियन हस्की जातीच्या श्वानाला चप्पल आणि लाथेने मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण केल्यामुळे पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जुनेद शेख असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, कोंढवा पोलिस ठाण्यात सदर व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dog Beaten In Pune
Nashik Accident News: धावत्या रेल्वेत पाच महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; प्रवासात नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला असून त्या प्राणीमित्र आहेत. त्या स्वतः एका संस्थेसाठी काम करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ आला होता. या व्हिडिओमध्ये जुनेद शेख यांनी त्यांच्या ताब्यातील काळ्या पांढऱ्या रंगाच्या सायबेरियन हस्की जातीच्या चार महिन्यांच्या श्वानाच्या पिल्लाला चप्पल आणि लाथेनी मारहाण केली आहे. तसेच क्रूर वागणूक देऊन त्यांनी त्याला जखमी केले आहे.

महिलेने हा व्हिडिओ पाहताच व्यक्ती विरोधत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी देखील ताक्ताळ सदर व्यक्तीवर कारवाई केली आहे.

Dog Beaten In Pune
Warm Water Well In Amravati:विहिरीतून येतंय चक्क उकळतं पाणी; चमत्कार आहे की आणखीन काही?

कुत्र्याला हटकले म्‍हणून तरुणाला मारहाण

रात्री कामावरून घरी परतणाऱ्या तरुणावर पाळीव कुत्रा भुंकला. कुत्र्याला घाबरून त्या तरुणाने कुत्र्याला दगड मारत हटकल्याचा राग येत चौघांनी शिवीगाळ करीत तरुणाला लोखंडी पाइपने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना का ही दिवसांपूर्वील घडली. जखमींच्या जबाबावरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com