

सचिन जाधव
Pune News: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीच्या मृत्यूनंतर महिला आणि मुलाने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना हडपसर (Hadapasar) परिसरातील फुरसुंगी भागातील एका सोसायटीत घडलीये. सदर घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Pune Crime News)
पती,पत्नी आणि मुलाने मे महिन्यात नैराश्यातून विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर रुग्णालयातून घरी परतलेली महिला आणि मुलाने पुन्हा विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.
जनाबाई सूर्यप्रकाश अबनावे (वय ६०) आणि चेतन सूर्यप्रकाश अबनावे (वय ४१) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. २२ मे रोजी सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे (वय ७०, रा. लक्ष्मी निवास, फुरसुंगी), त्यांची पत्नी जनाबाई, मुलगा चेतन यांनी विषारी ओैषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिघांना ससून रुग्णालयात ( Hospital) दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सूर्यप्रकाश यांचा मृत्यू झाला होता.
उपचारानंतर जनाबाई आणि त्यांचा मुलगा चेतन यांना घरी सोडण्यात आले होते. दोघांनी सोमवारी विषारी ओैषध पिऊन पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
चेतन याचा घटस्फोट झाला होता. तो नोकरी करत नव्हता. कौटुंबिक समस्या,तसेच आजारपणामुळे एकाच कुटुंबातील तिघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.