CNG Hikes : पुणेकरांचं आर्थिक गणित बिघडणार, CNG च्या दरांमध्ये पुन्हा वाढ

CNG prices hikes : पुण्यामध्ये सीएनजीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. वर्षाचा शेवट होता होता, पुन्हा एकदा सीएनजीच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आह.
Effective from midnight, Pune's CNG price rises by ₹1.10 per kg, setting the new rate at ₹89 per kg. MNGL cites global energy market fluctuations as the reason for the hike
CNG Price HikeSaam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune CNG Price Hike : पुणेकरांच्या खर्चामध्ये आणखी वाढ होणार आहे. कारण, CNG च्या दरांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. एमएनजीएलकडून सीएनजीच्या दरांमध्ये १.१० रुपये प्रति किलो दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ जागतिक बाजारातील चढ-उतारांचा थेट परिणाम असल्याचे सांगितले जातं आहे. सी एन जी साठी आता नवीन किंमत ८९ रुपये प्रति किलो इतकी राहणार आहे. याआधी सीएनजी ८७.९० प्रति किलो इतकी होती. आता पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात सीएनजीचे नवीन दर ८९ रुपये प्रतिकिलोवर पोहचले आहेत.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने पुण्यातील कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या दरात मध्यरात्रीपासून प्रति किलो 1.10 रुपयांनी वाढ केली आहे. आता पुण्यात सीएनजीचे दर 89 रुपये प्रति किलो इतके झाले आहेत. जागतिक ऊर्जा बाजारातील सुरू असलेल्या चढ-उतारांमुळे सीएनजीच्या दरात वाढ केल्याचं सांगितले जात आहे.

Effective from midnight, Pune's CNG price rises by ₹1.10 per kg, setting the new rate at ₹89 per kg. MNGL cites global energy market fluctuations as the reason for the hike
CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ; तुमच्या शहरातील दर काय? जाणून घ्या

आयात नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली झपाट्याने वाढ आणि बाजारातील दरांवर आधारित पुरवठा याचं संतुलन करण्याचं मोठं आव्हान MNGLसमोर असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या वाढीमध्ये उत्पादन शुल्क आणि राज्य व्हॅटचा समावेश असेल, जे एकूण वाढी पैकी सुमारे 15% आहे.CNG Hikes

Effective from midnight, Pune's CNG price rises by ₹1.10 per kg, setting the new rate at ₹89 per kg. MNGL cites global energy market fluctuations as the reason for the hike
CNG Price Hike : वाहन चालकांच्या खिशाला बसणार झळ, १४ महिन्यात तब्बल ७५% दरवाढ; काय आहे कारण?

पुणे महानगरपालिका क्षेत्र, फुरसुंगी, पिसोळी आणि आंबेगाव, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्र, हिंजवडी आणि चाकणमध्ये CNG चे दर 89 रुपये प्रति किलो असल्याचे MNGL वेबसाइटवर दाखवत आहे. नव्या वर्षाच्या आधीच पुणेकरांना मोठा धक्का बसलाय. सीएनजीच्या दरात एक रूपयांपेक्षा जास्त किंमत वाढवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com