Pune Porsche Car Accident: दोघांचा जीव घेणाऱ्या 'पोर्शे' कारची धक्कादायक स्टोरी, नोंदणीविनाच गाडी रस्त्यावर धावली; टॅक्स न भरताच दिली लेकाच्या ताब्यात

Pune Porsche Car Accident Updates: एकीकडे या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असतानाच आता या अपघातातील महागड्या पोर्शे कारसंबंधी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Pune Porsche Car Accident: दोघांचा जीव घेणाऱ्या 'पोर्शे' कारची धक्कादायक स्टोरी, नोंदणीविनाच गाडी रस्त्यावर धावली; टॅक्स न भरताच दिली लेकाच्या ताब्यात
Pune Porsche Car Accident News Updates: Saam Tv

सागर आव्हाड, पुणे|ता. २१ मे २०२४

पुणे शहरातील हिट अँड रन प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या अपघातात दोघांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अल्पवयीन आरोपीला कारवाईऐवजी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप पोलीस प्रशासनावर होत आहे. एकीकडे या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असतानाच आता या अपघातातील महागड्या पोर्शे कारसंबंधी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शोरुमधून नवे वाहन खरेदी केल्यानंतर वाहतुक नियमांनुसार त्याची नोंदणी झाल्यानंतर, आरटीओकडून अधिकृत नंबर आल्यानंतरच गाडी रस्त्यावर उतरवली जाते. गाडी खरेदी केल्यानंतर ही सर्व नियमांनुसार प्रक्रिया करुन मालकाच्या ताब्यात देण्याची जबाबदारी संबंधित शोरुमकडे असते. मात्र पुण्यात दोघांचा बळी घेणाऱ्या पोर्शे कारची अधिकृत नोंदणीच झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उद्योगपती विक्रम अगरवाल यांची ही गाडी २० मार्च रोजी मुंबईतील एका डिलरने परराज्यातून आणली होती. त्यानंतर गाडी नावावर करण्यासाठी अर्ज करण्यात आला. आरटीओकडून गाडीची तपासणी झाली. गाडीच्या किंमतीनुसार ४० लाखांचा कर भरण्यास सांगण्यात आले होते.

Pune Porsche Car Accident: दोघांचा जीव घेणाऱ्या 'पोर्शे' कारची धक्कादायक स्टोरी, नोंदणीविनाच गाडी रस्त्यावर धावली; टॅक्स न भरताच दिली लेकाच्या ताब्यात
Sanjay Raut: 'जिथे महाविकास आघाडीची सरशी, तिथेच संथ गतीने काम', संजय राऊतांना वेगळीच शंका; निवडणूक आयोगावर निशाणा!

मात्र ही कराची रक्कम न भरता, गाडीची नोंदणी प्रक्रिया न करताच ती रस्त्यावर आणण्यात आली. तसेच लायसन्स नसलेल्या १७ मुलाच्या ताब्यात दिल्याचे उघडकीस आले आहे. विनानंबर, विना परवाना गाडी रस्त्यावर चालवणे हा मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा आहे. तसेच वाहन चालविण्याचा परवाना नसनेही गुन्हा आहे.

त्यामुळे पोर्श या अलिशान गाडी चालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ज्या दिवसांपासून गाडी खरेदी केली आहे, त्या दिवसांपासून कराच्या रकमेवर दंडाची रक्कम आकारली जाईल. दरम्यान, याप्रकरणी विशाल अगरवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com