VIDEO: स्टंटबाजी जिवावर बेतली! ताम्हिणी घाटात तरुण वाहून गेला, मित्रांच्या डोळ्यादेखत घडला थरार; घटना कॅमेऱ्यात कैद

Pune Tamhini Ghat Breaking News: ताम्हिणी घाटामध्ये एक तरुण वाहून गेल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Tamhini Ghat Video: स्टंटबाजी जिवावर बेतली! ताम्हिणी घाटात तरुण वाहून गेला; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
Pune Tamhini Ghat Breaking News:Saamtv

अक्षय बडवे, पुणे| १ जुलै २०२४

लोणावळ्यातील भुशी डॅमवर एकाच घरातील पाच जण वाहून गेल्याची मन सुन्न करणारी घटना घडली. ही घटना ताजी असतानाच आता ताम्हिणी घाटामध्ये एक तरुण वाहून गेल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टंटबाजी करण्याच्या नादात हा तरुण वाहून गेल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्टंटबाजी करण्याच्या नादात ताम्हिणी घाटामध्ये एक तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वप्नील धावडे असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून तो आपल्या जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता.

शनिवारी (ता. २९ जून) ताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने धबधब्यातील पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला. पाण्याचा वेग जास्त असल्याने त्याला कडेला आले नाही, ज्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. ताम्हिणीमध्ये बुडालेल्या या तरुणाचा मृतदेह मानगावमध्ये सापडला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Tamhini Ghat Video: स्टंटबाजी जिवावर बेतली! ताम्हिणी घाटात तरुण वाहून गेला; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
Pune Fake Police VIDEO : क्रिकेट चाहत्यांना मारहाण करणाऱ्या तोतया पोलीसाला फरासखाना पोलीसांनकडून अटक

दरम्यान, भुशी डॅममध्ये पाच पर्यटक वाहून गेल्यानंतर समोर आलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. लोणावळा, खंडाळा भागात वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाऊ नये. आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये, भुशी डॅम परिसर, घुबड तलाव, टाटा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉईंट, भागात पर्यटकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Tamhini Ghat Video: स्टंटबाजी जिवावर बेतली! ताम्हिणी घाटात तरुण वाहून गेला; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
Parliament Session: 'भाजपचा गर्व संपवणारी निवडणूक, पंतप्रधान फक्त 'मन की बात'मध्ये व्यस्त; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; राज्यसभेत घमासान!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com