Sharad Pawar News: ईडी भाजपचा घटक पक्ष, कारवाया फक्त विरोधी नेत्यांवर.. शरद पवारांनी थेट आकडेवारीच मांडली!

Sharad Pawar Press Conference Pune: आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज शरद पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Baramati Politics News
Baramati Politics NewsSaam Tv
Published On

नितीन पाटणकर, पुणे|ता. ११ मार्च २०२४

Sharad Pawar Press Conference:

आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज शरद पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांचा वापर करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला.

काय म्हणाले शरद पवार?

"१५ तो १७ तारखे दरम्यान निवडणूक जाहीर होईल.निवडणुक आयोगाची आधी फारशी चर्चा नव्हती. पण एका सदस्याने राजीनामा दिला आहे. त्याची कारणमिमांसा दिला नाही. त्यामुळे आम्हाला काळजी वाटते. ⁠तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. याचे उदाहरण म्हणजे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री. त्यांना अटक केली. पण कोर्टाने त्यांना निर्दोष सोडले," असे शरद पवार म्हणाले.

कारवाई फक्त विरोधी नेत्यांवर...

⁠"हेच काम महाराषट्रात सुरु झाले आहे. अनिल देशमुख त्याचे उदाहरण. त्यांच्यावर १०० कोटींचा आरोप ठेवला. पण चार्जशिट मध्ये १ कोटी चेकने घेतल्याचा म्हटले आहे. ईडीने १४७ नेत्यांची चौकशी केली. त्यातील ९५ टक्के नेते विरोधी पक्षातील आहेत. आठ वर्षात भाजपने १२१ विरोधी पक्ष नेत्यांवर कारवाई केली. यात एक ही बीजेपीचे नाहीत," असे ते म्हणाले.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Baramati Politics News
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : संभाजीनगर मनपाचा पाणीपुरवठा ठप्प, टॅंकर भाव खाऊ लागला

अप्रत्यक्ष धमकी..

"तसेच ⁠युपीएच्या काळात ईडी राजकीय सुडाने वागत नव्हती. युपीए काळात २६ काँग्रेस नेत्यांवर कारवाई झाली. तर भाजपच्या ३ नेत्यांवर कारवाई झाली. ⁠भाजप नेत्यांना माहीत असते ईडी कारवाई करणार आहे. ते तशा धमक्या ही देतात. निवडणुकीला तुम्ही उभे राहु नका. अशी अप्रत्यक्ष धमकी ईडी मार्फत दिली जात आहे," असा थेट आरोपही शरद पवार यांनी केला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com