ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपायाची आत्महत्या

ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या शिपायाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उगडकिस आली आहे. रज्जाक मोहम्मद मणेरी असे या पोलीस शिपायाचे नाव असून यांच्या मृतदेहाजवळ सॉरी मॉम असे लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे.
ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपायाची आत्महत्या
ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपायाची आत्महत्याSaam Tv
Published On

पुणे - ग्रामीण पोलीस Police दलात कार्यरत असलेल्या शिपायाने आत्महत्या Suicide केल्याची धक्कादायक घटना उगडकिस आली आहे. रज्जाक मोहम्मद मणेरी असे या पोलीस शिपायाचे नाव असून यांच्या मृतदेहाजवळ सॉरी मॉम असे लिहिलेली सुसाईड नोट Suicide Note सापडली आहे. या घटनेचा पुढील तपस पोलीस करत आहेत. Pune Bhor Police constable Razzak Muhammad Maneri Committed suicide

हे देखील पहा -

रज्जाक हा मूळचा इंदापूर तालुक्यातील मणेरी येथील रहिवाशी होता. पण गेल्या काही वर्षांपासून रज्जाक हा पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता. रज्जाकचे नातेवाईक गेल्या २ दिवसांपासून त्याला फोन करत होते. मात्र तो फोन उचलत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी तो राहत असलेले ठिकाण गाठले. त्या ठिकाणी आल्यानंतर नातेवाईकांना रज्जाक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपायाची आत्महत्या
बीड पोलीस दलात १६५ वाहनांची भर; धनंजय मुंडेंच्या हस्ते वाहनांचे लोकार्पण 

यानंतर त्याच्या नाइटवाईकांनी तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर त्यांना रज्जाकच्या मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोट सापडली. या नोटमध्ये रज्जाकने सॉरी मॉम असे लिहिले होते. रज्जाकने गळफास घेण्यापूर्वी आपली नस कापून घेतली होती. दरम्यान सध्या या घटनेचा तपास सुरु आहे. मात्र या पोलीस शिपायाने आत्महत्या का केली? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com