
सचिन जाधव , साम प्रतिनिधी
राज्य सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी गुरुवारी बदल्यांचे आदेश काढले आहेत. यात साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पुणे जिल्हाधिकारी पदी पदस्थापना देण्यात आलीय. यानंतर एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती वेगवेगळा कार्यभार सांभाळणार आहे.
जितेंद्र डुडी पुणे जिल्हाधिकारी पदावर असून त्यांच्या पत्नी आंचल दलाल भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) असून पुणे जिल्ह्यातील राज्य राखीव दलात (एसआरपीएफ आहेत, तर शेखर सिंह डुडी यांचे मेहुणे असून ते काही महिन्यांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त पदावर कार्यरत आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील सचिवपदी पदोन्नती मिळालीय. त्यांची राज्याचे जमाबंदी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी सातारा जिल्ह्याचे जितेंद्र डुडी यांना पदस्थापना दिलीय. त्यांच्याजागी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आलीय. दरम्यान जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झालीय. तर त्यांची पत्नी ह्या भारतीय पोलीस सेवेत आयपीएस आहेत. तर शेखर सिंह डुडी हे जितेंद्र डुडी यांचे मेहुणे असून ते आयुक्त पदावर कार्यरत आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पुण्याचा वेगवेगळा कारभार संभाळणार आहेत.
जितेंद्र डुडी पुणे जिल्हाधिकारी पदावर असून त्यांच्या पत्नी आंचल दलाल भारतीय पोलीस सेवेत असून पुणे जिल्ह्यातील राज्य राखीव दलात एसआरपीएफ आहेत, तर शेखर सिंह डुडी यांचे मेहुणे असून ते काही महिन्यांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त पदावर कार्यरत आहेत.
जितेंद्र डुडी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) २०१६ च्या शाखेतील सनदी अधिकारी.
जितेंद्र डुडी हे मूळचे जयपूरचे (राजस्थान) आहेत. डुडी यांनी प्रशासकीय सेवेत झारखंड येथून सुरुवात केली. केंद्र सरकारमध्ये सहाय्यक सचिवपदी देखील त्यांनी कामकाज पाहिलंय.
२०१८ मध्ये त्यांना महाराष्ट्रात पदस्थापना देण्यात आलीय. पुणे जिल्ह्यात यापूर्वी त्यांनी जुन्नर प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकीर म्हणूनही त्यांनी कारभार संभाळलाय. पुण्याचे जिल्हाधिकारी होण्याआधी ते सातारा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.