CCTV Video : दोन बाईकची समोरासमोर धडक, हेल्मेटमुळे एकाचा जीव वाचला, दुसरा जागीच गेला; पुणे-नगर महामार्गावर थरार

Pune Accident Video : पुणे-नगर महामार्गावर दोन दुचाकी एकमेंकांना जोरात धडकल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला आहेत तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Pune Accident News
Pune Accident News Saam Digital
Published On

पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रस्त्यावरून दुचाकी ने अचानक वळण घेतलं आणि दोन दुचाकींची एकमेंकांना जोराची धडक बसली. यात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ज्या दुचाकीस्वाराने दुचाकी अचानक वळवली होती. तो मात्र हेल्मेट घातल्यामुळे या अपघातातून बचावला आहे.

संदीप गाडीलकर असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नावं आहे. तर दत्तात्रय धुमाळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना 20 ऑगस्ट रोजी पुणे-नगर महामार्गावर कारेगाव या ठिकाणी घडली होती. अज्ञात चालक हा पुणे ते नगर जाणारे रस्त्यावर रस्ता ओलांडून कर्डलवाडीच्या दिशेने जात होता. त्यावेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने दुचाकीवर अचानक वळल्यामुळे पुण्याच्या दिशेने येणारे संदीप नामदेव गाडीलकर आणि दत्तात्रय धुमाळ यांची अज्ञात चालकाच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.

धडक इतकी जोराची होती की संदीप गाडीलकर आणि दत्तात्रय धुमाळ उडून रस्त्याच्या बाजूला जावून पडले. यात संदीप गाडीलकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर दत्तात्रय धुमाळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Pune Accident News
Mumbai Crime News : ऐकावं ते नवलच! पोलिसांच्याच घरी टाकला डाका, दरोडेखोराने १३ पोलिसांची घरं फोडली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com