Prithviraj Chavan :...म्हणून भाजप पक्ष फोडतेय; अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

Prithviraj Chavan Latest News : 'अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे आम्हाला सर्वांना अतिशय धक्का बसला आहे. भाजपला जनतेचं समर्थन मिळत नाही म्हणून पक्ष फोडत आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
prithviraj chavan
prithviraj chavansaam tv

सूरज मसुरकर, मुंबई

Prithviraj chavan Latest News :

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस हायकमांड अलर्ट झाली आहे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. 'अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे आम्हाला सर्वांना अतिशय धक्का बसला आहे. भाजपला जनतेचं समर्थन मिळत नाही म्हणून पक्ष फोडत आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. (Latest Marathi News)

पृथ्वीराज चव्हण काय म्हणाले?

पृथ्वीराज चव्हाण यांनी अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, 'आज अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. आम्हाला सर्वांना अतिशय धक्का बसला आहे. असं काही घडेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. त्यांनी असं का केलं, हे ते स्वत: सांगतील. त्यांनी पुढील भूमिका स्पष्ट केली नाही. ते जन्मापासून काँग्रेसमध्ये होते. त्यांना पक्षाने खूप काही दिले. '. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

prithviraj chavan
Ashok Chavan: प्रामणिकपणे काम केलं; भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही... राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया!

' आगामी राज्यसभेचीही चर्चा झाली होती. अशोक चव्हाणांच्या डोक्यात हे असं काही असेल हे आम्हाला माहीत नव्हतं. त्यांची जागावाटपात प्रमुख भुमिका होती. पक्षाने त्यांना मोठा सन्मान दिला होता. भाजपकडून असं काही घडणार याचं सुतोवाच होत होतं. ते आज झालं आहे. उद्या किंवा परवा विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली जाईल. आम्ही इतर सर्वांशी सुसंवाद साधला आहे. कोणी कुठे जाणार नाही. आम्ही जनतेकडे न्याय मागू, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

prithviraj chavan
Maharashtra Politics: अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता; आमदारांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू!

'भाजपचं निवडणुकीला सामोरे जायचं धाडस नाही. मतदारही या नेत्यासोबत कधी जाणार नाही. ते निवडणूकीला सामोरे जातील, तेव्हा त्यांना समजेल. पक्ष मजबूतीने येणाऱ्या राजकीय आव्हानांना सामोरे जाणार आहे. भाजपला जनतेचं समर्थन मिळत नसल्याने भाजप पक्ष फोडतेय. ही भाजपची रणनिती आहे, असेही त्यांनी चव्हाण यांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com