सुशांत सावंत -
मुंबई : नोटबंदीला Denomination आज 5 वर्षे पूर्ण झाली परंतु परदेशात असणारं ना काळ धन परत आलं ना भ्रष्टाचार Corruption कमी झाला ना आतंकवाद Terrorism. मोदींनी तीन महिने देशवासियांकडे मागितले होते. मात्र आता त्यांनीच सांगाव की आता आम्ही कोणत्या चौकात यायच आहे अशा आशयाच ट्विट अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक Nawab Malik यांनी आज केलं आहे. त्यांच्या या ट्विटवरती . 'मोदींना शिक्षा देण्याची औकात मलिकांची नाही.' अशा तीव्र शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर Pravin Darekar यांनी मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
दरेकर म्हणाले 'मोदी यांना शिक्षा देण्याची औकात मलिक यांची नाही. तसेच नवाब मलिक यांच्याकडे नोटा असाव्यात त्याची विलेवाट कुठे लावायची याचा ते विचार करत असतील. तसेच अन्यथा मलिकांच्या पोटात दुखण्याचे कारण काय ? असा देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच नवाब मलिक यांच्याकडील आता मटेरिअल संपत आले आहे म्हणूनच ते व्यक्तिगत स्तरावर प्रकरण बाहेर काढत आहेत. आज अनेक तक्रारी नवाब मलिकांच्यावर पडत आहेत त्याची सर्व उत्तरे नवाब मलिक यांना द्यावी लागतील असही ते म्हणाले.
हे देखील पहा -
ST च्या प्रश्नाबाबत सरकार असंवेदनशील
दरम्यान ST च्या कर्मचाऱ्यांना सरकारने न्याय द्यायला हवा कर्मचाऱ्यांनी आंदोलन हातात घेतले आहे हे आंदोलन आता पेटले आहे. सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी विलनीकरण कशापद्धतीने होईल याचा विचार करायला हवा. मला वाटतं हे सरकार असंवेदनशील आहे. प्रत्येकाला न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे सरकार डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.