'राजकीय घरफोड्या कोण? हे सर्वांना माहितेय, यातून छत्रपतींचं घर तरी सुटायला पाहिजे होतं'

'जे झालं ते राज्याने पाहिले आहे. याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल. छत्रपती हे राजकीय भूमिका निभावणारे व्यक्तिमत्व नाही.'
SambhajiRaje Chhatrapati
SambhajiRaje ChhatrapatiSaam TV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई : संभाजीराजेंनी अत्यंत परिपक्व भूमिका मांडली, आपल्या घरात मतभेद वाद असल्याचे चित्र जनतेसमोर जाणं संयुक्तीत ठरणार नाही. राजेंच्या घरामध्ये वाद निर्माण करणाऱ्यांवर टीका केलेली, राजकीय घरफोड्या कशा झाल्या हे राज्याने पाहिलं आहे. त्यावर राजेंच्या सहकाऱ्यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेची विश्वासहर्ता संपुष्टात येत होती ती सावरण्यासाठी त्यांनी काढलेला हा मार्ग असल्याचं वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलं आहे.

'राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन शिवसेनेने संभाजीराजेंची (SambhajiRaje Chhatrapati) कोंडी केली, असा अपप्रचार भाजपने केला. मात्र, छत्रपती शाहूंनी फडणवीस आणि त्यांच्या कंपनीचा मुखवटा फाडल्याचं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कोल्हापुरात केलं तसचं त्यांनी शाहू महाराजांची भेट देखील घेतली. यावेळी राऊतांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना दरेकर बोलत होते.

हे देखील पाहा -

या सर्व प्रकरणामागे बोलवता धनी कोण? राजकीय घरफोड्या कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे. निदान यातून छत्रपतींचे घर तरी सुटलं पाहिजे होतं. एकसंघ असलेल्या घराण्यात वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. शिवसेनेचा (Shivsena) डॅमेज कंट्रोलचा हा केविलवाणा प्रयत्न असून, मराठा समाजात प्रचंड असंतोष आहे. कावळे असतात तिथे कावकाव होते आणि संजय राउत असे नेहमी कावकाव करतात. छत्रपतींचा अवमान करण्याचा अधिकार राऊतांना कोणी दिला असा सवाल यावेळी दरेकरांनी उपस्थित केला.

तसंच या सर्व घडामोडींमागे भाजपचा डाव असायचे काहीच कारण नाही. भाजपने सहा वर्ष राष्ट्रपती कोट्यातून त्यांना खासदार केले होते. राजेंना चौकटीत बसवून काम करवुन घेणे योग्य नाही. पवार साहेबानी पाठींब्याची भूमिका जाहीर केली. शरद पवार यांचे प्रवक्ते असलेले राऊत म्हणाले आम्ही उमेदवार देऊ, छत्रपतींचा सन्मान केला की अवमान केला हे शिवसैनिकांनी पाहिले आहे. आता जे झालं ते राज्याने पाहिले आहे याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल. छत्रपती हे राजकीय भूमिका निभावणारे व्यक्तिमत्व नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा खेळी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं देखील दरेकरांनी यावेळी स्पष्ट केलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com