

एन्काऊंटर प्रकरणातील तपास आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
पोलिस फिर्यादीत आर्याने गोळीबार केल्याचा उल्लेख नाहीये.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांच्या गोळीबारात रोहित आर्याचा मृत्यू
पवईतील आरए स्टुडिओमधील ओलीस प्रकरणात एन्काऊंटर प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा करणार आहे. पोलिसांच्या चकमकीत ठार झालेला रोहित आर्याने २० जणांना ओलीस ठेवलं होतं. ऑडिशनला आलेल्या मुलांना ओलीस ठेवल्यानंतर रोहित आर्यानं एक व्हिडिओ रिलीज इमारतीला आग लावण्याची धमकी दिली होती. मुलांना वाचवण्यासाठी पोलिसांनी रोहित आर्याचा एन्काऊंटर केला. आता या एन्काऊंटर प्रकरणी अनेक वेगवेगळे खुलासे होत आहेत.
दरम्यान या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. रोहित आर्या एन्काऊंटर प्रकरणाबाबत पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीतून नवा खुलासा झालाय. पोलिस फिर्यादीत आर्याने पोलिसांवर गोळी झाडल्याचा कोणताही उल्लेख नाहीये. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची आवश्यकता होती? तसेच आर्याच्या कटामागे इतर कोणी सहभागी होते का? याचीही चौकशी केली जात आहे.
घटनेत सहभागी सहायक निरीक्षक अमोल वाघमारे यांच्या फिर्यादीवरून आर्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. दरम्यान वाघमारे यांच्या गोळीबारातच आर्याचा मृत्यू झाला होता. आर्याने पोलिसांवर गोळी झाडल्याचा उल्लेख नाहीये. पोलिसांनी नमूद केल्याप्रमाणे ओलीस मुलांच्या सुटकेसाठी बाथरुमच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आर्याने बंदूक रोखल्याने मुलांची सुरक्षा आणि स्वसंरक्षणाच्या उद्देशाने गोळी झाडण्यात आली, असा दावा पोलिसांनी केलाय.
दरम्यान आर्याच्या मृत्यूबाबत पवई पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर लहान मुलांना ओलीस ठेवणे, अपहरण आणि खुनाचा प्रयत्न यांसह गंभीर कलमांखाली आर्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही प्रकरणांचा तपास मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय.
अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे आणि उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा हा तपास केला जाणार आहे. मुंबई पोलिस अधिनियमानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्यास दंडाधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र चौकशी केली जाते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक पत्रव्यवहार केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.