Kalyan Pothole: बड्डे आहे खड्ड्यांचा...! केक कापून वाढदिवस साजरा; खड्ड्यांप्रश्नी मनसे पुन्हा आक्रमक

Pothole Birthday: महापालिका आयुक्तांनी गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील असे आश्वासन दिले होते.
Kalyan Pothole
Kalyan PotholeSaam TV
Published On

अभिजीत देशमुख

Kalyan News:

आज सर्वत्र गणरायाच्या विसर्जनाची धामधूम आणि गर्दी पाहायला मिळत आहे. भाविक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेत. विसर्जनावर पावसाचं सावट पाहायला मिळत आहे. त्यातच खड्ड्यांमुळे कल्याणकरांचे हाल झालेत. खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशा चाळण झालीये. त्यामुळे मनसेने पुन्हा एकदा आपल्या स्टाइलने आंदोलन केलंय. मनसेने थेट खड्ड्यांसाठी केक कापत बर्थडे सेलिब्रेशन केलं आहे. (Latest Marathi News)

Kalyan Pothole
MNS Andolan : नवरात्रोत्सवापूर्वी कामगारांना पगार द्या, केडीएमसीच्या कंत्राटी कामगारांच्या वेतनाबाबत मनसे आक्रमक

गणेश विसर्जन मार्गावरील दुर्गाडी गणेश घाटाजवळ खड्ड्यात केक कापत आयुक्त,शहर अभियंता, कार्यकारी अभियंत्याच्या प्रतिमेचे विसर्जन करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील असे आश्वासन दिले. मात्र गणरायाचं आगमनी खड्डातून झालं.

आता विसर्जनाच्या दिवशी देखील बाप्पांना या खड्ड्यातूनच परतीचा प्रवास करावा लागतोय . खड्ड्यांवरून मनसेने आक्रमक पवित्र घेतलाय. आज मनसेने दुर्गाडी किल्ल्या जवळील गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यात केक कापत 'खड्डे का बर्थडे' आंदोलन केलं.

आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आयुक्त शहर अभियंता कार्यकारी अभियंत्यांच्या प्रतिमेला केक भरवत प्रतिमेचे विसर्जन केले. जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेचा निषेध नोंदवला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी गणेश विसर्जनापूर्वी शहरातील रस्ते खड्डे मुक्त केले जातील असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते.

मात्र टेंडरमधून किती मलाई निघते याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचा ठेकेदारावर अंकुश नाही. अधिकारी ऑफिसमध्ये बसून आदेश काढतात, शहरात किती खड्डे आहेत, किती खड्डे भरलेत याची साधी माहिती त्यांच्याकडे नाही म्हणूनच महापालिकेच्या निषेधार्थ आज खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करत अधिकाऱ्यांच्या प्रतिमेचा विसर्जन मनसेकडून करण्यात आलं आहे.

Kalyan Pothole
Nanded Crime News: धक्कादायक! गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, नांदेडमध्ये भर वस्तीत घडला थरार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com