Raj Thackeray News: महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री राज ठाकरे; शिवतीर्थासमोर बॅनरबाजी

Raj Thackeray future Chief Minister Banner: भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव देखील घेतले जात आहे.
Raj Thackeray Latest News
Raj Thackeray Latest NewsSaam Tv
Published On

निवृत्ती बाबर

Political News: राज्याचे भावी मुख्यमंत्री कोण असणार यावरून राजकीय वर्तृळात तुफान चर्चा सुरु आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांच्या नावाची चर्चा रंगली होती. त्यानंतर प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते आपापल्या पक्षातील वरिष्ठ नेत्याला भावी मुख्यमंत्री म्हणत बॅनरबाजी करत आहेत. आता या भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव देखील घेतले जात आहे. (Latest Marathi News)

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच मुंबईतील शिवतीर्थासमोर त्यांचे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर राज ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री आहेत, असं लिहिण्यात आलं आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोरच भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेलं बॅनर लावल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु आहे.

Raj Thackeray Latest News
Nana Patole News: पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच!; नागपुरात झळकले नाना पटोलेंचे बॅनर; भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा १४ जून रोजी वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. राज्याला एक वेळ मुख्यमंत्री नसला तरी चालेल पण प्रत्येक राज्याला किमान एक तरी राज ठाकरे नक्की असावेत असा उल्लेख या बॅनरमध्ये करण्यात आला आहे.

गेल्याच आठवड्यात ४ जून रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव देखील भावी मुख्यमंत्री म्हणून घेण्यात आले. ५ जून रोजी पटोलेंचा वाढदिवस होता. त्यामुळे नागपूरात बॅनरबाजी करण्यात आली होती. पोस्टरवर माननीय आमदार नाना पटोले भावी मुख्यमंत्री, शेतकरी पुत्र, कामकरी लोकांचे कैवारी, असा उल्लेख करण्यात आला होता. नागपूरात गिरीश पांडव हे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांनी नाना पटोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असे बॅनर लावले होते.

Raj Thackeray Latest News
Dadar Abhimaan Geet Song Out: राज ठाकरे यांच्या हस्ते दादरचे पहिलेवहिले अभिमान गीत प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com