Cabinet Expansion News : शिवसेना-भाजपचा नवा मित्र कोण? राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता; पडद्यामागे नेमकं चाललंय काय?

Political News : येत्या 8-9 जुलै रोजी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.
Eknath Shinde-Devendra Fadanavis
Eknath Shinde-Devendra FadanavisSaam TV
Published On

Mumbai News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी आज भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडत आहेत. तर एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावल्याची माहिती आहे.

भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर उद्या मुख्यमंत्री शिवसेनेच्या मंत्र्यासोबत बैठक घेऊन मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करु शकतात. येत्या 8-9 जुलै रोजी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde-Devendra Fadanavis
Maharashtra Politics: राष्ट्रवादीत अजित पवारच 'दादा'? प्रदेशाध्यक्ष निवडीआधी बडे नेते भेटीला

मंत्रिमंडळ विस्तारात धक्का तंत्राचा वापर

सध्या राज्याचा कारभार 20 मंत्री हाकत आहेत. तर मंत्रिमंडळ विस्तारात आणखी 23 नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना-भाजपसाठी 12 मंत्रिपदं आणि 10 मंत्रिपदं ही सोबत येणाऱ्या मित्रपक्षांसाठी राखीव ठेवले जाऊ शकतात.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसपूस सुरु असल्याची चर्चा आहे. याचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून आणि इतर पक्षांतून काही बडे नेते सोबत आले तर त्यांना काही मंत्रिपदं दिली जाऊ शकतात. त्या दृष्टीने येत्या काळात हालचाली होण्याची शक्यता आहे. (Political News)

Eknath Shinde-Devendra Fadanavis
Samana Editorial News: KCR यांचंही ‘मिंधे’ मॉडेल; ते भाजपच्या मदतीसाठीच महाराष्ट्रात... सामनामधून 'रोखठोक' टीका

भाजपची सध्याची गरज

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 40 जागा जिंकण्याचं भाजप-शिवसेना युतीचं लक्ष्य आहे. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता 40 जागा जिंकणे सेना-भाजप युतीसाठी कठीण जाईल अशी शक्यता आहे. तसेच अनेक सर्वेंमधूनही हे स्पष्ट होताना दिसत आहे. त्यामुळे 40 जागा जिंकायच्या असतील तर इतर पक्षातील बड्या नेत्यांना सोबत घ्यावं लागेल.

त्या दृष्टीने भाजप रणनिती आखत असल्याचं बोललं जात आहे. दिल्ली आणि राज्यातील भाजपचे बडे नेते काही नेत्यांशी चर्चा करत असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र भाजपचा हा प्लान यशस्वी झाल्यात आगामी काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

Edit By - Pravin Wakchoure

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com