Samana Editorial News: KCR यांचंही ‘मिंधे’ मॉडेल; ते भाजपच्या मदतीसाठीच महाराष्ट्रात... सामनामधून 'रोखठोक' टीका

Samana Editorial On KCR: जो उठतोय तो महाराष्ट्राचे सत्ताकारण व अर्थकारण ताब्यात घेऊ इच्छितो; अशा शब्दात सामनामधून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
Samana Editorial News
Samana Editorial NewsSaamtv
Published On

Samana Editorial On BRS Entry In Maharashtra : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी या पक्षात प्रवेश केला होता. तसेच नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीनिमित्त त्यांनी ६०० गाड्यांच्या ताफ्यासह पंढरपुर विठ्ठलाचे दर्श घेतले होते.

बीआरएसचे महाराष्ट्रात चाललेल्या या शक्तिप्रदर्शनावर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

काय आहे 'सामना'मधील रोखठोक टीका...

महाराष्ट्राच्या राजकारणात तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी त्यांचा ताफा घुसवला आहे. कालपर्यंत हेच के.सी.आर घोर भाजपविरोधी (BJP) म्हणून उभे होते. मोदी यांच्या विरोधात वज्रमूठ उभी करण्यासाठी ते देशात फिरले. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेशरद पवार यांना भेटून गेले. त्याच महाशयांनी आता 'यू टर्न घेतला आहे.. अशा शब्दात केसीआर यांच्यावर सामना मधून (Samana) जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

तसेच ते महाराष्ट्रात घुसत आहेत ते भाजपच्या मदतीसाठीच असा थेट आरोपही यामध्ये करण्यात आला आहे. आघाडीसाठी शड्डू ठोकणारे चंद्रशेखर राव आज दुसऱ्या टोकाला उभे आहेत ते फक्त मोदींच्या (Narendra Modi) मदतीसाठीच अशी खोचक टीकाही केली आहे.

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा...

महाराष्ट्राचे राजकारण हा एकेकाळी पुरोगामी विचारांचा भुईकोट किल्ला होता. बाहेरच्या विचारांचे कीटक येथे घुसत नव्हते. आता महाराष्ट्राची अवस्था कोसळत चाललेल्या किल्ल्यासारखी झाली आहे. अमित शहांपासून तेलंगणाच्या के. चंद्रशेखर रावांपर्यंत जो उठतोय तो महाराष्ट्राचे सत्ताकारण व अर्थकारण ताब्यात घेऊ इच्छितो. मराठी राज्यासाठी ही धोक्याची घंटा आहे; असेही या सदरात म्हणले आहे... (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com