Ajit Pawar : पाप कुठे फेडणार..., अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?

Pimpari Chinchwad Ajit Pawar News : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वाढत्या कर्जावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली. ‘आशिया खंडातील श्रीमंत महापालिका कर्जात बुडवण्याचे पाप कुठे फेडणार?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Ajit Pawar : पाप कुठे फेडणार..., अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?
Pimpari Chinchwad Ajit PawarSaam Tv
Published On
Summary
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्जावरून अजित पवारांचा भाजप आमदारावर टीका

  • टँकर माफिया व निविदा राजकारणातून पाणी संकट कृत्रिमरित्या निर्माण केल्याचा आरोप

  • संत पीठाचे खासगीकरण आणि वारकरी साहित्याऐवजी CBSE स्कूल सुरू केल्यावर सवाल

  • महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा उघड

गोपाळ मोटघरे, पिंपरी चिंचवड

महापालिका निवडणूका जाहीर झाल्यापासून राज्याच्या राजकारणात रुसव्या फुगव्यांची मालिका पाहायला मिळते आहे. महायुतीत जागावाटपांवरून नेते मंडळी नाराज असल्याचे दिसून येत आहेत. या चढाओढीत आता राज्यातील महापालिकेंवर कोणाचा झेंडा रोवणारा हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं. यासाठी नेतेमंडळी तयारीला लागले आहेत. ठिकठिकाणी नेते मंडळींच्या सभा सुरु आहेत. अशातच काल झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिका कर्जाच्या डोंगराखाली बुडवली असल्याचा टोला भाजप आमदाराला लगावला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये भाषणादरम्यान अजित पवार म्हणाले, कधी कधी आशिया खंडात सर्वात श्रीमंत असलेली पिंपरी चिंचवड महापालिका यांनी कर्जाच्या डोंगराखाली बुडवली. हे पाप कुठे फेडणार? अशी सणसणीत टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता भोसरी विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यावर केली आहे.

Ajit Pawar : पाप कुठे फेडणार..., अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?
Shocking : २० रुपये देण्यास नकार दिला, रागात नवऱ्याने बायकोची गळा दाबून केली हत्या, नंतर स्वत: धावत्या ट्रेनसमोर मारली उडी

पुढे ते म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात फोडाफोडीच राजकारण सुरू आहे. लोकांन वर दबाव टाकलं जात आहे. महापालिकेच्या निविदा फक्त ठेकेदाराचे हित जोपासण्यासाठी काढण्यात येत आहेत. टँकर माफियाना सभाळन्यासाठी लोकांना पाणी दिल जात नाही अशी सडकून टीका अजित पवार यांनी नाव न घेता शहरातील भाजप आमदारावर केली आहे.

Ajit Pawar : पाप कुठे फेडणार..., अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?
Weather Update : मुंबईसह राज्यात तापमानाचा पारा घसरला, पावसाप्रमाणे थंडीचाही मुक्काम वाढणार; आज कुठे कसं हवामान?

स्वर्गीय नगरसेवक दत्ता काका साने यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले संत पिठाचा खासगी कंपनी करण्यात आली, संत पिठात संत साहित्य ऐवजी CBSE स्कूल सुरू करण्यात आली. अशाने वारकरी साहित्याचे अभ्यास करणारे वारकरी कसे तयार होणार असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी महेश लांडगे यांच्या कारभारावर सडकून टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com