पुणे : अनेकदा पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात मात्र पुणे जिल्ह्यातील नारायणगावच्या (Narayangaon) गावकऱ्यांनी मात्र पोलिसांचा कार्यगौरव समारंभ व सत्कार केला आहे.
हे देखील पहा -
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील भर दिवसा बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) मध्ये दरोडा पडला होता. या दरोड्यात बँकेतील 30 लाख रोख रक्कम व 2 कोटींचे दागिन्यांची लूट झाली होती. हा दरोडा तपास फक्त 8 दिवसात तातडीने लावल्याबद्दल नारायणगाव येथील युवा शक्ती फाऊंडेशन, आणि राजे ग्रुप यांच्या वतीने या तपासातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचार्यांचा कार्यगौरव समारंभ व सत्कार आज नारायणगाव पोलीस ठाण्यात (Narayangaon Police Station) पार पडला. अशा पद्धतीने नागरिकांनी सत्कार केल्याने पोलीस अधिकारी भारावले होते.
दरोडा तपासातील स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, व पोलीस हवालदार दिपक साबळे, पोलीस हवालदर विक्रम तापकीर, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, पोलीस हवालदार राजू मोमीन, पोलीस हवालदार अजित भुजबळ, पोलीस नाईक मंगेश थिगळे, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस शिपाई अक्षय नवले, पोलीस शिपाई निलेश सुपेकर यांसह पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांच्या शाल, कार्यगौरव सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.