पोलीस सरकाचे दलाल म्हणून काम करत असल्याचा आमदार गिरीश महाजन यांचा आरोप

वरिष्ठांकडे विषय गेला आहे. जो गुन्हा घडला नाही तो तुम्ही नोंद केला, माझ्याकडे पुरावे असतानाही तक्रार नोंदवून घेत नाहीत.
Girish Mahajan
Girish Mahajan Saam TV
Published On

सुशांत सावंत

मुंबई: आज सभागृहामध्ये माजी मंत्री आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पेन ड्राईव्ह (Pendrive) फ्रकरणावर चर्चा केली. यावेळी त्यांनी माझ्याकडे पुरावे असतानाही तक्रार नोंदवून घेत नाहीत. पोलिस (Police) आम्हाला मदत करत नाहीत. पोलीस सरकाचे दलाल म्हणून काम करत असल्याचा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी यावेळी केला. वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavhan) यांच्या विरोधात मी पुण्यात गुन्हा दाखल केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जो पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला होता त्यात सर्वांनी पाहिलं की, चव्हाण कसे माझ्या विरोधात कट रचत होते. पोलीस अधिकारी त्यांच्याशी ते चर्चा करत आहेत, रेड कशी करायची याची यात चर्चा आहे. सरकार मधील प्रमुख मंत्र्यांचा यात उल्लेख आहे, असही ते म्हणाले.

माझ्या विरोधात कट कारस्थान केलं. यासाठी मी वकील चव्हाण यांच्या विरोधात मी शिवाजी नगर पोलीस (Police) स्टेशन मध्ये तक्रार केली आहे. याची सीबीआय (CBI) चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही केली आहे. या केसमध्ये पोलीस, प्रशासक अधिकारी जे आहेत, विशेष करून सत्ताधारी पक्षातील मोठे नेते यात आहेत. त्यामुळे सीआयडी व्यवस्थित चौकशी कणार नाहीत. त्यांच आम्हाला सहकार्य मिळणार नसल्याचे, महाजन म्हणाले.

Girish Mahajan
Devendra Fadnavis LIVE : देवेंद्र फडणवीस विधानसभेतून लाईव्ह, पाहा व्हिडीओ | SAAM TV

त्यामुळे आम्हाला सीबीआय (CBI) चौकशी हवी आहे. न्यायालयातून आम्ही न्याय मिळवून घेणार आहोत. पांडे साहेब आल्यावर आपल्याला कशी मदत मिळेल, तत्कालीन मंत्री कशी मदत करत आहेत. याचा उल्लेख या पेनड्राईव्हमध्ये आहे. त्यामुळे हे सगळं षडयंत्र असल्याचं स्पष्ट दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला. चव्हाण यांच्या विरोधात तक्रार करून 4 दिवस झाले आहेत. वरिष्ठांकडे विषय गेला आहे. जो गुन्हा घडला नाही तो तुम्ही नोंद केला, माझ्याकडे पुरावे असतानाही तक्रार नोंदवून घेत नाहीत. पोलिस (Police) आम्हाला मदत करत नाहीत. पोलीस सरकाचे दलाल म्हणून काम करत असल्याचा आरोप आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी यावेळी केला.

Edited By - Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com