PM Modi in Mumbai: 'मी मुंबईत असेन...', दौऱ्याआधी PM मोदींचं मराठीत ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात एकूण 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली जाणार आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSaam Tv

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदी आपल्या दौऱ्यात मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासह अनेक विकासकामांची पायाभरणी करणार आहेत. एकूण 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली जाणार आहे. मोदींना आपल्या दौऱ्याआधी मराठीत ट्वीट करत आपण मुंबईत येत असल्याची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटलं की, मी उद्या मुंबईत असेन. 38,000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल. (Latest Marathi News)

PM Narendra Modi
PM Modi in Mumbai: मुंबईत मोदी-बाळासाहेबांच्या पोस्टर्सची चर्चा; मात्र लक्षवेधी पोस्टर्स कुणी लावले कळेना

कसा असेल मोदींचा मुंबई दौरा?

पंतप्रधान मोदी 5 ते 6.10 एमएमआरडीए मैदानवरती लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहतील. संध्याकाळी 6.30 पंतप्रधान मोदी गुंदवली मेट्रो स्टेशन - 6.30 ते 7 मेट्रो उद्घाटन आणि मेट्रोतून प्रवास करणार आहेत. संध्याकाळी 7.05 वाजता मेट्रो स्टेशनमधून निघणार 7.15 मुंबई विमान तळावरून दिल्लीला रवाना होतील. सुरक्षतेची खबरदारी लक्षात घेता मेट्रो-1 ची सेवा बंद रहाणार. संध्याकाळी 5.45 ते 7.30 पर्यंत मेट्रो सेवा बंद राहणार आहे.

PM Narendra Modi
Cabinet Expansion : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; शिंदे गटाला तीन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता, 'या' खासदारांना मिळणार संधी?

सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरून शिवसेनेचे मुखपत्र सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. शिवसेनेने आणि मुंबई महापालिकेने केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचं काम सुरु आहे.

काम शिवसेनेचे, मेहनत मुंबई महापालिकेची व प्रचाराच्या चिपळ्या भाजप वाजवणार, अशा शब्दात सामनातून शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com