Cabinet Expansion : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; शिंदे गटाला तीन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता, 'या' खासदारांना मिळणार संधी?

बीएमसी निवडणुका जवळ आल्याने राहुल शेवाळेंना मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे.
PM Modi - Eknath shinde
PM Modi - Eknath shindeSaam Digital
Published On

नवी दिल्ली : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. अनेक इच्छुक आमदारही मंत्रिमंडळ विस्ताराची आतुरतेने वाट वाट पाहत आहेत. मात्र राज्य मंत्रिमंडळ विस्ताराआधीच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला तीन मंत्रीपदं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

शिंदे गटाला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि दोन राज्यमंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती आहे. मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना संधी मिळू शकते. राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

बीएमसी निवडणुका जवळ आल्याने राहुल शेवाळेंना मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. श्रीरंग बारणेंना मंत्रीपद देऊन पश्चिम महाराष्ट्र मजबूत करण्यावर शिंदे गटाचा भर असणार आहे. विदर्भातही प्रतापराव जाधव यांना मंत्रीपद दिलं जाणार आहे.

PM Modi - Eknath shinde
PM Narendra Modi | पंतप्रधान मोदी आज मुंबईत, मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

प्रतापराव जाधव हे लोकसभेत सलग तिसऱ्यांदा निवडणूक गेले आहेत. त्यांची ही तिसरी टर्म आहे. यापूर्वी सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मनोहर जोशींच्या काळात ते क्रीडा मंत्री होते.

नितीश कुमार, उद्धव ठाकरे आणि अकाली दलाचे सुखबीर सिंग बादल यांनी एनडीएची साथ सोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या रूपानं भाजपला खंबीर साथीदार मिळाला आहे. त्यामुळे भाजपनं शिंदे गटाला तीन मंत्रीपदं देण्याचं ठरवलं असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com