Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी चिंचवड शहरात अमली पदार्थाची विक्री; एकास अटक

एका नामांकित संस्थेच्या विद्यार्थ्यांना गांजा पूरवठा हाेत असल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले.
Ravi Thapa
Ravi Thapasaam tv

Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी चिंचवड शहरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थे जवळ मेफेनटरमाईन सल्फेट आणि गांजा विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाेलीसांनी एकास अटक केली आहे. (Maharashtra News)

Ravi Thapa
Kolhapur GramSabha News: ए ए रां....,ग्रामसभेत दाेन गटात राडा, खूर्च्या फेकून मारल्याने ग्रामस्थ जखमी

महाविद्यालयीन मुले जिम मध्ये जास्त वेळ व्यायाम करता यावा, तसेच शरीर सुडोल दिसावे आणि सेक्स पाॅवर वाढवा यासाठी मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन खरेदी करत असल्याचं पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहर पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने वाय सी एम हॉस्पिटल जवळ केलेल्या कारवाईत रवि चंद्रकांत थापा (वय 32) याच ताब्यात घेत त्याची चाैकशी केली.

Ravi Thapa
Saam Tv Exclusive : काेकणातील हापूस की कर्नाटकी ? आंबा खरेदीपुर्वी असं ओळखा (पाहा व्हिडिओ)

या चाैकशीनंतर त्याच्याकडून जवळपास ९५ मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या बाटल्या, ६४२ ग्रॅम गांजा आणि २००० रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल पाेलीसांनी जप्त केला. रवि चंद्रकांत थापा हा वाय सी एम हॉस्पिटल जवळील एका नामांकित संस्थेच्या विद्यार्थ्यांना मेफेनटरमाईन सल्फेट आणि गांजा पुरवठा करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात पिंपरी पोलीस स्टेशन मध्ये रवि चंद्रकांत थापावर (कलम २७६,३३६,३२८ व एन डी पी एस एकट कलम ८( क), २० (ब ) प्रमाणे) गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com