मंत्रालयात लागणार फुले दाम्पत्याचे फोटो; छगन भुजबळांनी मानले शिंदे सरकारचे आभार

महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्याची छगन भुजबळ यांनी मागणी केली होती.
Mahatma Jotirao Phule and Savitribai Phule
Mahatma Jotirao Phule and Savitribai PhuleSaam TV
Published On

रश्मी पुराणिक -

नाशिक: मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्य शासनाचे आभार मानले.

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अधिवेशन काळात प्रत्यक्ष भेटून केली होती.

याबाबत आज शासनाच्या वतीने मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात निर्णय घेण्यात आला आहे. त्याबद्दल छगन भुजबळ यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.

पाहा व्हिडीओ -

भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते की, मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर दर्शनी भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजमाता जिजाऊ या महापुरूषांचे तैलचित्र लावण्यात आले आहेत.

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील थोर समाजसुधारक आणि महिला शिक्षणाच्या अग्रणी क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांनी विशेषत: महिला शिक्षणासाठी खुप मोलाची भूमिका बजावली आहे. आज भारतामध्ये स्त्री शिक्षणाविषयी निर्माण झालेली जागृती ही महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले (Mahatma Jotirao Phule and Savitribai Phule) यांनी केलेल्या कार्यामुळेच आहे.

Mahatma Jotirao Phule and Savitribai Phule
Shivsena Vs Rana: शिवसेनेची नवनीत राणांवर जहरी टीका; 'एका सी ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या...'

महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वेचले, बालविवाह, सती, केशवपन अशा अनेक क्रूर पद्धतींना त्यांनी विरोध केला. महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या तैलचित्राशेजारी महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात यावे अशी मागणी त्यांनी केलेली होती.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com