Phone Taping Case: IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा; फोन टॅपिंग प्रकरणातील दोन्ही गुन्हे हायकोर्टाकडून रद्द

IPS Rashmi Shukla Phone Taping Case: मुंबई हायकोर्टाकडून रश्मि शुक्ला यांच्याविरोधातील दोन FIR रद्द करण्यात आले आहेत.
Rashmi Shukla Phone Tapping case News Updates
Rashmi Shukla Phone Tapping case News Updates Saam Tv

IPS Rashmi Shukla News: आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाकडून रश्मि शुक्ला यांच्याविरोधातील दोन FIR रद्द करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विरोधी नेत्यांचे बेकायदेशीररित्या फोन रेकॉर्ड केल्याप्रकरणी हे एफआयआर दाखल करण्यात आले होते.

Rashmi Shukla Phone Tapping case News Updates
Chhatrapati Shivaji Maharajs Wagh Nakh: शिवाजी महाराजांची वाघनखं ब्रिटनमध्ये गेली कशी, काय आहे इतिहास?

याबाबत अधिक माहिती अशी की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्याने विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

या प्रकरणात पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याप्रकरणी तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना हे दोन्ही गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Rashmi Shukla Phone Tapping case News Updates
Mumbai Rain Alert: मुंबईकरांनो, छत्र्या घेऊनच घराबाहेर पडा; पुढील ३-४ तासांत पावसाचा जोर वाढणार; IMD कडून अलर्ट

दरम्यान, पुण्यातील प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे, कुलाबा प्रकरणात शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यास राज्य सरकारनं मंजुरी देण्यास नकार दिला होता. आता मुंबई हायकोर्टाकडून त्यांना या प्रकरणी क्लिनचिट मिळाली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com