टोल वसुली विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई- पुणे जुन्या हायवे वरील टोल प्लाझा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Toll plaza
Toll plazaSaam Tv
Published On

मुंबई: टोल (Toll) वसुली विरोधात मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुनावणीची होण्याची शक्यता आहे. वकील आणि सामाजिक कार्यकर्ते अॅड. प्रवीण वाटेगावकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.

मुंबई- पुणे जुन्या हायवे वरील टोल प्लाझा (Toll) विरोधात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. हायवे वरील सोमाटणे आणि वरसोली येथील टोल प्लाझा अवैध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नियमाचे उल्लंघन करून टोल वसुली केली जात असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकेची एक प्रत केंद्र सरकारकडे पाठवली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

Toll plaza
Video : आता 60 किलोमीटरमध्ये दुसरा टोल नसणार..! ; गडकरी यांनी दिली माहिती

याचिकेत हे मुद्दे आहेत

याचिकेत राष्ट्रीय महामार्ग 48 च्या मुंबई-पुणे येथील सोमाटणे फी प्लाझावरील शुल्क/टोल वसुलीला (Toll Recovery) आव्हान दिले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highway) दोन शुल्क/टोल प्लाझांमधील किमान अंतराच्या 60 किलोमीटरच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे याचिकेत म्हटले आहे. राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर आणि संकलनाचे निर्धारण) नियम, 2008 द्वारे अनिवार्य केले आहे. वरसोली फी प्लाझा (लोणावळा) आणि सोमाटणे (देहू रोड) फी प्लाझामधील वास्तविक अंतर फक्त 31 किमी एवढे असल्याचे म्हटले आहे.

नियमांनुसार महानगरपालिका किंवा नगर क्षेत्राच्या हद्दीपासून 5 किलोमीटर अंतराच्या हद्दीत टोल प्लाझा (Toll) स्थापन करण्यास मनाई आहे. सोमाटणे टोल प्लाझा (Toll Plaza) तळेगाव दाभाडे महानगरपालिकेच्या लिंब फाट्यापासून सुमारे ३.५ किलोमीटर अंतरावर आहे.

याचिकेत राष्ट्रीय महामार्ग (National Highway) 48 वरील सोमाटणे येथे टोल प्लाझा, मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचे घोषित करण्यात याव्यात सोमाटणे प्लाझावर फी/टोल वसूल करण्यापासून कंपनीला प्रतिबंधित करावे, असं वकील प्रवीण वाटेगावकर (Pramod Vategaonkar) यांनी म्हटले आहे.

Edited By - Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com