यंदाही दहीहंडी नाहीच! मुख्यमंत्र्यानी नाकारली परवानगी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गोविंदा पथकाच्या शिष्टमंडळासोबत दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी नाकारली आहे.
यंदाही दहीहंडी नाहीच! मुख्यमंत्र्यानी नाकारली परवानगी
यंदाही दहीहंडी नाहीच! मुख्यमंत्र्यानी नाकारली परवानगीSaam TV News
Published On

मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अनेक सण-उत्सवांवर निर्बंध लावावे लागले आहेत. सध्या राज्यात कोरोना रुग्ण कमी असल्याने यंदाच्या वर्षी दहीहंडी उत्सव साजरा करुन द्यावा अशी मागणी होत होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गोविंदा पथकाच्या शिष्टमंडळासोबत दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी नाकारली आहे. त्यामुळे यंदाही महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव साजरा करता येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. (Permission denied for dahi handi by the CM Uddhav Thackeray)

हे देखील पहा -

आज मुख्यमंत्र्यांनी गोविंदा पथकाच्या शिष्टमंडळाशी याबाबत ऑनलाईन चर्चा केली. या चर्चेत गोविंदा पथकांनी मागणी केली की, ''यंदा छोट्या स्वरुपात का होईना पण आम्हाला दहीहंडी साजरी करण्याची परवानगी द्यावी. आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळू, याशिवाय लसीचे दोन डोस पुर्ण झालेल्या गोविंदांनाच उत्सवात सहभागी करुन घेउ, किमान मानाच्या दहीहंडींना परवानगी द्यावी.'' यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ''टास्क फोर्सच्या काही डॉक्टरांनी काही अडचणी सांगितल्या आहेत. कोरोना हा चिकनपॉक्स प्रमाणे पसरू शकतो. दहीहंडी खांद्याला खांदा लावून होते त्यामुळे जर कोरोना वाढला तर त्याच गालबोट उत्सवाला लागायला नको. परवानगी देताना यंत्रणांवर ताण होईल.

आज मुख्यमंत्र्यांनी गोविंदा पथकाच्या शिष्टमंडळाशी याबाबत ऑनलाईन चर्चा केली
आज मुख्यमंत्र्यांनी गोविंदा पथकाच्या शिष्टमंडळाशी याबाबत ऑनलाईन चर्चा केलीSaam Tv News

जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण -वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

याबाबत भाजपचे आमदार राम कदम यांनी मात्र मुख्यमंत्र्याच्या या निर्णयावर आक्षेप घेत टीका केली आहे. राम कदम म्हणाले की, बारला परवानगी देतात, इतरांच्या सणांना परवानगी देतात मग हिंदुंच्या सणांना परवानगी का नाही. एअर कंडीशनर रुममध्ये बसून दहीहंडी साजरी करु नका असं सांगणार असाल तर हिंदु बांधव ते ऐकणार नाही. आम्ही दहीहंडी साजरी करणारच असंही राम कदम म्हणाले आहेत.

यंदाही दहीहंडी नाहीच! मुख्यमंत्र्यानी नाकारली परवानगी
अभिनेते-निर्माते महेश मांजरेकर यांची कॅन्सरवर मात; मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रिया

सोबतच मनसेच्या अभिजीत पानसे यांनी देखील यापुर्वीच दहीहंडी साजरा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे सरकार आणि विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com