बक्षिसांची दिवाळी ‘सकाळ महाउत्सवा’मध्ये सहभागी व्हा आणि जिंका कोट्यवधींची बक्षीसे

कार,इलेक्ट्रॉनिक दुचाकी, स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच आणि ब्लूटूथ स्पीकर अशी भरघोस बक्षीसे नागरिकांना जिंकण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे.
Sakal Mahautsava
Sakal MahautsavaSaam TV
Published On

प्राची कुलकर्णी -

पुणे: दसऱ्यापासून सुरू होत असलेल्या आगामी सणांच्या निमित्ताने खरेदी करीत तब्बल एक कोटीहून अधिक रकमेची बक्षीसे जिंकण्याची संधी यंदाच्या सणासुदीच्या हंगामात मिळणार आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खरेदीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ‘सकाळ महाउत्सवा’चे (Sakal Mahautsava) आयोजन करण्यात आले आहे.

त्यात कार, आठ इलेक्ट्रॉनिक दुचाकी, स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच आणि ब्लूटूथ स्पीकर अशी भरघोस बक्षीसे नागरिकांना जिंकण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. पुणे (Pune), पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील आपल्या आवडीच्या दुकानातून केलेल्या वस्तूंच्या खरेदीवर ही बक्षीसे मिळतील.

पाहा व्हिडीओ -

जिल्ह्यातील आघाडीच्या स्थानिक ब्रँड्सना एकाच प्लॅटफॉर्मवर आणणारा हा एक मेगा शॉपिंग फेस्टिव्हल आहे. २६ सप्टेंबरपासून सुरू झालेला खरेदीचा हा ‘महाउत्सव’ ३१ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. (Mega Shopping Festival)

असे मिळणार बक्षिस -

‘महाउत्सवा’त सहभागी असलेल्या विविध ब्रॅँडचे आउटलेट, दुकानांमधून ग्राहक त्यांच्या आवडीच्या वस्तू खरेदी करतील. ठराविक रकमेच्या वस्तुंची खरेदी केल्यानंतर दुकानात ग्राहकांना कुपन देण्यात येर्इल. उत्सवादरम्यान दोन लकी ड्रॉ आणि एक महा बंपर ड्रॉ होणार आहे. त्यातील विजेत्यांची नावे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित केली जातील. विजेत्यांना संपर्क करून बक्षिसांचे वितरण केले जार्इल.

बाजारपेठांमधील उलाढाल वाढणार -

Sakal Mahautsava
ST Employee : एसटी संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार : सूत्र

कोरोनामुळे गेली दोन वर्ष नागरिकांना सणवार साध्या पद्धतीने साजरे करावे लागले. त्याचा फटका व्यावसायिकांना देखील सहन करावा लागला. आता मात्र कोरोनाचे सावट दूर झाल्याने खरेदीदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

यानिमित्ताने सर्वच प्रकारच्या बाजारपेठांमधील उलाढाल वाढल्याने व्यावसायिकांमध्ये देखील उत्साह आहे. घटस्थापनेपासून दिवाळीपर्यंत विविध सणानिमित्त ग्राहक आपल्या आवडीच्या वस्तूंच्या खरेदीचा बेत आतापासूनच आखत आहेत. खरेदीचा हा ‘महाउत्सव’ ग्राहक आणि व्यावसायिकांसाठी देखील अत्यंत लाभदायी ठरणार आहे.

महाउत्सवात सहभागी होणारे व्यावसायिक -

बांधकाम क्षेत्र, विविध प्रकारचे सेवापुरवठादार, हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ वितरक, रिटेल, ज्वेलरी, टेलिकॉम, फर्निचर, गारमेंट्स, इलेक्ट्रॉनिक्स, गृहोपयोगी वस्तू, सेवा, माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा, ऑटोमोबाइल्स आणि इतर.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com