ST Employee : एसटी संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार : सूत्र

मुख्यमंत्री यांनी परिवहन विभागाच्या बैठकीत हे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.
ST Bus
ST BusSaam Tv
Published On

मुंबई : एसटी संपाच्या (ST Strike) काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन विभागाच्या बैठकीत हे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.

संप काळात जवळपास 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. या सर्व कर्माचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

ST Bus
उद्धव ठाकरे यांचे 'ते' वक्तव्य खालच्या दर्जाचं; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबर 2021 पासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. जवळपास सहा महिने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. (Latest Marathi News)

ST Bus
Udayanraje Bhosale : पैशाशिवाय त्यांना दुसरं काही सूचत नाही; उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना प्रत्युत्तर

मार्च 2022 मध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर कर्मचाऱ्यांनी कामावर येण्यास सुरुवात केली. मात्र काही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम होते. त्यामुळे सरकारचा आदेश झुगारुन अनेकांना कामावर रुजू होण्यास नकार दिला. या सर्व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई परिवहन विभागाने कारवाई केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com