Parambir Effect : महिला अधिकाऱ्यासह एक CID च्या जाळ्यात

श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंग यांच्याविरोधात वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Parmbir Effect : महिला अधिकाऱ्यासह दोन CID च्या जाळ्यात
Parmbir Effect : महिला अधिकाऱ्यासह दोन CID च्या जाळ्यातSaam TV
Published On

मुंबई : स्टेट सीआयडीने (State CID) मुंबई पोलिस अधिकारी नंदकुमार गोपाळे व आशा कोकरे यांना अटक केली आहे. (Mumbai Police Officers NandKumar Gopale and Asha Kokare) मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात श्याम सुंदर अग्रवाल यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात ही अटक करण्यात आली आहे. श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंग यांच्याविरोधात वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Parambir effect: CIDs arrested Two along with women officers)

बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल आणि संजय पुनामिया यांनी भागीदारीत मे. बालाजी एंटरप्राइज व मे. राजा रामदेव इंटरप्रायजेस (Balaji Enterprise and RajaRamdev Enterprises) नावाची कंपनी 2008 मध्ये सुरू केली होती. या दोन कंपन्यांद्वारे दोघांनी 2006 ते 2011 पर्यंत भागीदारीत व्यवसाय केला. माञ गुंतवणूकीतील नफा व हिशोबासह इतर कारणांवरून दोघांमध्ये टोकाचे वाद झाल्याने ही भागीदारी 2011 मध्ये संपुष्ठात आली. माञ आरोप प्रत्यारोप यातून संजय पुनामिया यांनी अग्रवाल यांच्यावर मुंबईसह इतर जिल्हात अग्रवाल यांच्यावर 18 गुन्हे नोंदवले.

हे देखील पहा -

2016 मध्ये संजय पुनामिया (Sanjay Punamia) यांनी त्यांचा मिञ मनसुखलाल गांधी यांच्या तक्रारीवरून अग्रवाल यांच्यावर ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. त्यावेळी अग्रवाल हे न्यायालयीन कोठडीत होते. त्यावेळी पुनामिया याने त्याचा सहकारी सुनिल जैनने अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवाल यांच्याकडे त्यांचा हस्तक मनोज घोटकर याला पाठवले होते. घोटकरने पुनामिया हे परमबिर सिंह यांचे मिञ आहेत. ते परमबिर यांचे आर्थिक व्यवहार पाहतात. असे सांगितले. घोटकरने अग्रवाल यांना या गुन्ह्यांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी व नवीन गुन्हे नोंद होण्यापासून थांबवायचे असतील. तर संजय पुनामिया व परमबिर सिंह यांना संबधित जागा विकण्यास व 15 कोटी 50 लाख ऐवढ्या रक्कमेची मागणी केली. हे न केल्यास पुढची 5 वर्ष जेलमध्ये रहावे लागेल अशी धमकी दिली. त्यावेळी पुनामिया यांनी पोलिसांसाठी ही मोठ्या पैशांची मागणी केल्याचा आरोप अग्रवाल यांनी तक्रारीत केला आहे.

त्यानुसार परमबिर सिंह यांच्या घरी पुतण्या शरदने अग्रवाल व शुभम अग्रवाल यांची भेट घडवून दिली. त्यावेळी आर्थिक गुन्हे शाखेचे DCP पराग मणेरे हे देखील उपस्थित होते. अटक टाळण्यासाठी अग्रवाल यांनी पुनामियाला 15 कोटी 50 लाखांचा धनादेश व 25-25 लाख दोन हप्त्याने अग्रवाल यांचा कर्मचारी देवेंद्र पांचाळ यांच्याकडून पुनामिया यांच्याकडे पाठवले. त्यानंतर पुनामिया अग्रवाल याला ACP श्रीकांत शिंदेकडे घेऊन गेले. मोक्का गुन्ह्यात मदतीसाठी श्रीकांत शिंदेंना 25 लाख देण्यासाठी दटावले. त्यानुसार अग्रवालने 25 एप्रिल 2021 ला ते पैसे संजय पुनामिया यांच्याकडे दिले. त्यानंतर परमबिर सिंह व पुनामिया यांच्यात झालेल्या सेटलमेंट नुसार अग्रवाल यांच्यकडे 11 कोटींसाठी पुनामियाने तगादा लावला. यावेळी पुनामियाने पोलिसांचीही मदत घेऊन कुटुंबियांवर पाळत ठेवल्यचा आरोप केला आहे.

Parmbir Effect : महिला अधिकाऱ्यासह दोन CID च्या जाळ्यात
ST कर्मचाऱ्यांच्या मागण्या आधीच मान्य करायला हव्या होत्या - नाना पटोले

परमबिर सिंह हे मुंबई पोलिस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी पदाचा दुरुपयोग करून अग्रवाल यांच्यावर त्यांनी अंडरवल्ड डाँन छोटा शकील मार्फत पुनामियाला धमकी दिल्याच्या आरोपाखाली मोक्कोचा गुन्हा नोंदवून अटकेची धमकी दिली. तसेच पुतण्याचे सही घेऊन खोटे दस्तावेज बनवून अग्रवाल यांची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता खंडणी म्हणून घेतली. तर नंदकुमार गोपाळे, आणि आशा कोरके, यांनी 50 लाखांची खंडणी मागितली. अग्रवाल यांनी उसने पैसे घेऊन कोरके यांना 50 लाख दिले. यापूर्वी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या प्रकरणाच्या तपासासाठी SITची स्थापना करण्यात आली होती आणि तपास करण्यात आला होता त्यानंतर तेच प्रकरण CIDकडे हस्तांतरित करण्यात आले होते.

याप्रकरणी अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह, डीएसपी अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी आता CIDने मुंबई पोलिस अधिकारी नंदकुमार गोपाळे व आशा कोकरे यांना अटक केली आहे.

Edited By- Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com