Pandavkada Waterfall Ban: पर्यटकांसाठी मोठी बातमी! पांडवकडा धबधब्यावर पोलीस तैनात, नागरिकांना बंदी

Pandavkada waterfall Ban For Tourists: मात्र दरवर्षी याठिकाणी होणाऱ्या अपघातामुळे पांडवकडा धबधब्यावर जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे.
Pandavkada Waterfall Ban
Pandavkada Waterfall BanSaam TV
Published On

सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News: पावसाळ्याला सुरुवात होताच पर्यटकांची पावले आपसूकच डोंगर रांगात कोसळणाऱ्या धबधब्याकडे जातात. नवी मुंबईतील खारघर येथे असणाऱ्या प्रसिद्ध पांडवकडा धबधब्यावर जाऊन पावसाचा आनंद लुटण्यासाठी तरुणांसह नागरिक मोठी गर्दी करतायत. मात्र दरवर्षी याठिकाणी होणाऱ्या अपघातामुळे पांडवकडा धबधब्यावर जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. (Latest Marathi News)

त्यामुळे भर पावसात धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे स्वागत पोलीस करत असून या हौशी पर्यटकांना अडवण्यासाठी पोलिसांतर्फे खडा पहारा देण्यात येतोय. यामुळे पावसाळी पर्यटकांची मोठी निराशा होत असून हे पर्यटनस्थळ नागरिकांसाठी खुले करण्याची मागणी करण्यात येतेय.

Pandavkada Waterfall Ban
UP Crime News: बापरे! आंघोळीवरुन झाला वाद अन् घडलं भयंकर; लहान भावाने मोठ्या भावाला संपवलं

नवी मुंबईतील (New Mumbai) प्रसिद्ध पांडवकडा धबधब्यावर पर्यंटक मोठी गर्दी करत असून सुरक्षिततेच्या दृष्टीने धबधब्यावर जाण्यास बंदी असल्याने नागरिकांची निराशा होतायत. आतापर्यंत हिरव्यागार डोंगर रांगात असलेल्या पांडवकडा धबधब्यावर डोक्यात दगड पडून पाय घसरून अनेक जणांचा मृत्यू झालाय. धबधबा दिसायला सुंदर असला तरी काही हौशी पर्यटकांच्या गैरवागणुकीमुळे येथे दुर्घटनांचे प्रमाण वाढताना दिसते. जीवितहानी टाळण्यासाठी या धबधब्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पवसामुळे अनेक डोंगराळ भागात आणि घाटात देखील दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. महाड तालुक्यातील शेवते रस्त्यावर आज दरड कोसळली आहे. वाकी शेवते गावच्या रस्त्यातील घाट क्षेत्रात ही दरड कोसळली आहे. यामुळे शेवते आणि आडराई गावचा संपर्क तुटला आहे. दरड हटवण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयामार्फत उपाय योजना सुरु आहेत. आंबेनळी घाटात देखील एकाच महिन्यात दोन वेळा दरड कोसळण्याची घटना घडली आहे.

Pandavkada Waterfall Ban
Ahmednagar Crime News: अहमदनगर जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच! पट्ट्याने गळा आवळून अज्ञाताची हत्या; परिसरात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com