वसई विरार मध्ये लसीकरणासाठी रात्रभरापासून रांगा...
वसई विरार - परिसरात लसीकरणाचा Vaccination पुरता गोंधळ उडाला असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नागरिकांना पालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसींचा Vaccination Centre तुटवडा असल्याने लस मिळवण्यासाठी 24 तास अगोदर पासून नागरिक रांगा लावत आहे. शेकडो नागरिक, महिला, जेष्ठ नागरिक, तरुण लसीकरणाचे टोकण मिळवण्यासाठी रात्रभर रांगेत उभे राहत आहेत.
हे देखील पहा -
विरार पूर्व येथील नागरिक पालिकेच्या लसीकरण केंद्रावर आदल्या रात्री 10 वाजल्या पासून रांगा लागल्या जात आहेत. या केंद्रावर केवळ 150 लसीचे डोज दिले जातात. त्यातही 75 ऑफलाईन आणि 75 ऑनलाईन असे दिले जातात. केवळ 75 नंबरसाठी 500 हुन अधिक नागरिक रोज रात्री रांगेत उभे राहत आहेत.
सध्या पालिकेत केवळ 14 टक्के लसीकरण झाले असून पहिली लस केवळ 3.4 % नागरिकांना मिळाली आहे. एकीकडे पालिका लसींचा तुटवडा असल्याचे सांगत आहे तर दुसरीकडे खासगी केंद्रात मात्र बेफाम लशींची विक्री सुरू आहे. एका व्यक्तीला 780 रुपये भरून ही लस दिली जाते. तर सामान्य नागरिकांना पालिकेची मोफत लस मिळविण्यासाठी रात्रभर रांगेत उभे राहूनही लस मिळत नाही.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

