Osho Ashram Pune: ओशो आश्रम राडा प्रकरण; १२० अनुयायांविरोधात गुन्हा दाखल

Pune Latest News: ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला धुडकावून लावत ओशो अनुयायांनी आश्रमात प्रवेश केला होता, ज्यामुळे हा सगळा वाद निर्माण झाला होता..
Pune News
Pune NewsSaamtv
Published On

Koregaon Park Pune: काल पुण्यातील कोरेगाव पार्क स्थित ओशो (Osho Ashram) आश्रमामध्ये मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली होती. ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला धुडकावून लावत ओशो अनुयायांनी आश्रमात प्रवेश केला होता. संन्याशी माळा घालून ओशो अनुयायांनी प्रवेश केला मात्र काही वेळेपुरताच हा प्रवेश राहिला. त्यानंतर मात्र मोठा राडा आश्रमाच्या बाहेर पाहायला मिळाला. या प्रकरणी आता प्रशासनाने कठोर पाऊले उचलली असून १०० ते १२५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Pune News
Rahul Gandhi Convicted: मोठी बातमी! राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा; मोदी आडनावाबद्दल 'ते' वक्तव्य भोवलं

याबाबत अधिक माहिती अशी की, काल ओशो आश्रमाच्या बाहेर जोरदार आंदोलन करत आश्रमात शिरण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी भक्तांकडून सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्कीही झाली होती. या प्रकरणात आश्रमाच्या प्रवेशद्वारावर बेकायदा जमाव करुन आश्रमाच्या व्यवस्थापनाच्या विरुद्ध घोषणाबाजी तसेच आश्रमात प्रवेश करण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी १०० ते १२० अनुयायांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Osho Ashram Pune)

Pune News
Jalgaon News: चोरीची अनोखी शक्‍कल; कारची हवा सोडली अन्‌ लांबविले तीन लाख

दरम्यान, ओशो आश्रमाचे व्यवस्थापन आणि अनुयायांच्या गटात वाद सुरू आहेत. याच वादातून ओशो आश्रमाच्या परिसरात बुधवारी (२२ मार्च) मोठ्या संख्येने अनुयायी जमले होते. त्या वेळी ओशो आश्रमाच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करण्यात आली. बेकायदा प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. (Pune News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com